भीम पगारेची निघृर्ण हत्त्या बातमीचा जोड

By Admin | Updated: May 11, 2014 00:35 IST2014-05-11T00:35:31+5:302014-05-11T00:35:31+5:30

--इन्फ ो--

Due to the extinction of Bhim Pagare's extradition report | भीम पगारेची निघृर्ण हत्त्या बातमीचा जोड

भीम पगारेची निघृर्ण हत्त्या बातमीचा जोड

--
न्फ ो--
खून नक्की कशावरून?
मयत भीम पगारे याने एका व्यक्तीकडे सुमारे पाच-सहा लाखांची खंडणी मागितली होती़ या खंडणीतील सुमारे ५५ हजार रुपये शुक्रवारी रात्री पगारेला देण्यात आले व त्या पैशांवरून भांडण होऊन खून झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तविला असून, हा खून नक्की कोणत्या कारणावरून झाला याचा पोलीस शोध घेत आहेत़ दरम्यान शनिवारी दिवसभर सुमारे चौदा संशयितांची कसून चौकशी केल्याचेही वृत्त आहे़

--इन्फ ो--
पगारे सराईत गुन्हेगार
टोळक्यांनी हत्त्या केलेला भीम पगारे हा सराईत गुन्हेगार असल्याची पोलिसांत नोंद आहे़ त्याच्यावर नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यात खून, हाणामारी, सोनसाखळी चोरी, जबरी चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत़ पोलीस आयुक्तालयाने त्याची ही गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्यास नाशिक जिल्‘ातून तडीपारही केले होते़ मात्र तरीही तो शहरातच ठाण मांडून होता़

--इन्फ ो--
पगारे व संशयित आमने-सामने
अशोकस्तंभावरील एका वडापावच्या गाडीवर काही दिवसांपूर्वी भीम पगारे, चांगले बंधू, शेवरे बंधू आणि बरू यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती़ यावेळी संशयितांनी पगारेवर गरम तेल टाकण्याचा प्रयत्न केला होता मात्र पगारे तेथून सटकला़ यावेळी संशयितांनी पगारेला बघून घेण्याचा दम दिल्याची माहिती एका पोलीस अधिकार्‍याने दिली़

--इन्फ ो--
मध्यवर्ती तुरुंगात अर्जुन पगारेचा गोंधळ
भीम पगारेचा खून झाल्याचे वृत्त समजल्यानंतर चांगले खून प्रकरणातील संशयित अर्जुन पगारे याने मध्यवर्ती कारागृहात गोंधळ घातल्याचे वृत्त असून, दोन-तीन जणांना मारहाण केल्याचे वृत्त आहे़ मात्र या माहितीला अधिकृतरीत्या दुजोरा मिळू शकला नाही़

--इन्फ ो--
पोलिसांना आव्हान
चांगले खून प्रकरणातील संशयित गिरीश शे˜ीवर जिल्हा रुग्णालयाच्या प्रिझन वॉर्डवर हल्ला, सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सावंत यांना न्यायालय आवारात झालेली मारहाण, शुक्रवारी सायंकाळी सराईत गुन्हेगार भीम पगारेचा खून या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरात टोळीयुद्धाचा भडका उडाला असून चांगले, पगारे, टिप्पर अशा वेगवेगळ्या गुन्हेगारी टोळ्या निर्माण झाल्या असून, त्यांचे आपसात एकप्रकारे युद्ध सुरू झाले आहे़ या टोळीयुद्धाचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होऊ न देण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे़

--इन्फ ो--
ठक्कर बझारमधून पगारेे सटकला
हत्त्येच्या चार दिवस आधी भीम पगारे हा इनोव्हा गाडीमधून ठक्कर बझार परिसरात आला होता़ या ठिकाणी तो आल्याचे पोलिसांना समजताच त्यांनी या ठिकाणी सापळाही लावला, मात्र पोलीस मागावर असल्याचे समजताच तो पसार झाला़ त्यानंतर दोन दिवसांनी त्याची हत्त्या झाल्याची चर्चा पोलीस वर्तुळात होती़

--इन्फ ो--
मल्हारखाण परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त
शुक्रवारी रात्री भीम पगारेची हत्त्या झाल्यानंतर तणाव निर्माण होऊ नये यासाठी मल्हारखाण परिसरात शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सायंकाळपर्यंत प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़

Web Title: Due to the extinction of Bhim Pagare's extradition report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.