आवडतं गाणं वाजवलं नाही म्हणून 'डीजे'ला घातल्या गोळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2015 11:54 IST2015-06-23T14:04:49+5:302015-06-24T11:54:34+5:30

आपल्या आवडीचं गाणं वाजवलं नाही म्हणून एका तरूणाने 'डीजे'ला ( डिस्क जॉकी) सरळ गोळ्या घालून ठार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.

Due to the 'DJ' tablets that did not play the favorite song | आवडतं गाणं वाजवलं नाही म्हणून 'डीजे'ला घातल्या गोळ्या

आवडतं गाणं वाजवलं नाही म्हणून 'डीजे'ला घातल्या गोळ्या

>ऑनलाइन लोकमत
बरेली, दि. २३ - आपल्या आवडीचं गाणं वाजवलं नाही म्हणून एका तरूणाने 'डीजे'ला ( डिस्क जॉकी) सरळ गोळ्या घालून ठार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. मीरगंज भागातील सिधौली गावातील सराफ हरिओम गुप्ता यांच्या नातीच्या वाढदिवसानिमित्त काल एका पार्टी आयोजित करण्यात आली होती. पार्टीदरम्यान आशु उर्फ इशू याने अरुण वाल्मिकी (३०) या डीजेला एक गाणं वाजवायला सांगितलं होतं. मात्र अरूणने ते गाणं वाजवण्यास असमर्थता दर्शवली, त्यानंतर इशूने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अरूणला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 
घटनेची माहिती मिळताच आरोपी आशूला अटक करण्यासाठी त्याच्या घरी धाड टाकण्यात आली होती मात्र तो फरार झाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आशूचा कसून शोध घेण्यात येत आहे. 

Web Title: Due to the 'DJ' tablets that did not play the favorite song