शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे राम मंदिराच्या तयारीला 'ब्रेक', 30 एप्रिलला होणारे भूमीपूजन पुढे ढकलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 09:49 IST

देशतील परिस्थिती ठीक होईपर्यंत राम मंदिराचे भूमीपूजन करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचे  संकट येण्यापूर्वी, रामजन्मभूमी येथे विराजमान असलेल्या रामललाची निश्चित स्थळी प्रतिष्ठापना केल्यानंतर मंदिराचे काम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्दे30 एप्रिलला होणार होते राम मंदिराचे भूमीपूजदेशतील परिस्थिती ठीक होईपर्यंत करण्यात येणार नाही भूमीपूजनउत्तर प्रदेशमधील 52 जिल्ह्यांतील 1184 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण

अयोध्या : देशभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे आता राम मंदिर निर्माणाच्या तयारीलाही ब्रेक लागल्याचे दिसत आहे. 30 एप्रिलला राम मंदिराच्या भूमीपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी रामजन्मभूमी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी देशातील काही निवडक संत आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता कोरोना व्हायरसमुळे योग्य परिस्थिती नसल्याने कुठल्याही प्रकारच्या उत्सवाचे आयोजन करणे योग्य नाही, असे चंपत राय यांनी म्हटले आहे.

भूमीपूजनाला ब्रेक -लाइव्ह हिंदुस्तानने दिलेल्या एका वृत्तानुसार, देशतील परिस्थिती ठीक होईपर्यंत राम मंदिराचे भूमीपूजन करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचे  संकट येण्यापूर्वी, रामजन्मभूमी येथे विराजमान असलेल्या रामललाची निश्चित स्थळी प्रतिष्ठापना केल्यानंतर मंदिराचे काम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते. या संपूर्ण योजनेप्रमाणे चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी रामललाची नव्या भवनात प्रतिष्ठापना करून, वैशाख नवरात्र संपल्यानंतर 30 एप्रिलला भूमीपूजनाबरोबरच राम मंदिराच्या निर्माणालाही सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

उत्तर प्रदेशात सातत्याने समोर येतायेत नवे रुग्ण -उत्तर प्रदेशातही कोरोना हातपाय पसरू लागला आहे. सध्या राज्यातील मऊ, एटा आणि सुल्तानपूर येथे नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्य आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील 52 जिल्ह्यांतील 1184 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.

प्रसाद म्हणाले, की सोमवारी एकूण 3268 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यात 1184 जणांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. यातील 78 टक्के पुरुष असून इतर सर्व महिला आहेत. तसेच 28 दिवसांपासून एकही रुग्ण न आढळलेल्या जिल्ह्यांना ग्रीन झोन घोषित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत 140 जणांनी कोरोनावर मात केली असून ते ठणठणीत बरे झाले आहेत. तर 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याIndiaभारतUttar Pradeshउत्तर प्रदेश