शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

बदकांमुळे वाढतो पाण्यात ऑक्सिजन; विप्लव देव यांचा 'शोध'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 17:59 IST

नीरमहल येथे नौकानयन स्पर्धेचा शुभारंभ करताना त्यांनी आपली 'मते' मांडली.

आगरतळा- अत्यंत विचित्र विधानांमुळे चर्चेत येणाऱ्या विप्लव देव यांनी आता एक नवे विधान करुन खळबळ उडवून दिली आहे. पाण्यात बदक पोहल्यामुळे पाण्यात ऑक्सिजन वाढतो असे विधान त्यांनी केले आहे. पाण्यात ऑक्सीजनचे प्रमाण वाढण्यासाठी ते संपूर्ण राज्यात बदकांचे वाटप करण्याचा विचार करत आहेत.देव यांच्या मते, बदक वाटल्यामुळे ग्रामिण अर्थव्यवस्थेत तेजी येईल. बदक पाण्यात पोहल्यामुळे पाण्याचे रिसायकलिंग होते आणि त्यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. नीरमहल येथे नौकानयन स्पर्धेचा शुभारंभ करताना त्यांनी आपली 'मते' मांडली. विप्लव देव त्यांच्या सरकारतर्फे मासेमारी करणाऱ्या लोकांना 50 हजार बदकांचे वाटप करणार आहेत. जलाशयांच्या शेजारी पर्यटन केंद्रांजवळ यांचे वाटप होईल आणि त्यामुळे निसर्ग सौंदर्यात भर पडेल व ग्रामिण अर्थव्यवस्थेत भर पडेल असे त्यांना वाटते.

या संदर्भात देव म्हणाले, जेव्हा बदक पाण्यात पोहतात तेव्हा पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण आपोआप वाढते. त्यामुळे ऑक्सिजनचे रिसायकलिंग होते. पाण्यातील माशांना अधिक ऑक्सिजन मिऴतो. मग मासेही मोठ्या संख्येने वाढतात व नैसर्गिक पद्धतीने मत्स्यपालनाची वृद्धी होते. विप्लव देव त्यांच्या अशा विधानांमुळे चर्चेत येतात. मॉब लिचिंगमागे परदेशी षडयंत्र असल्याचेही विधान त्यांनी केले होते.

त्रिपुरात ‘एनआरसी’ची आवश्यकता नाही

यापुर्वी विप्लव देव यांनी अनेकदा अशी विधाने केली होती. याआधी त्यांनी एकदा आपल्या कामात नाक खुपसायचा प्रयत्न केल्यास मी त्याची नखंच तोडून टाकेन असं विधान केलं होतं. सकाळी ८ वाजता भाजी विक्रेता बाजारात दुधी घेऊन येतो आणि ९ वाजेपर्यंत त्यांची पार वाट लागते. कारण, येणारा प्रत्येक ग्राहक या दुधीला नखं लावत असतो. मी असं होऊ देणार नाही.  माझ्या सरकारला कुणीही हात लावू शकत नाही. त्यात कुणी नाक खुपसलं, हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला तर मी त्यांची नखंच तोडून टाकेन', असं विधान करून विप्लव देव यांनी पुन्हा नवा वाद ओढवून घेतला होता.

मोदी 'हिऱ्या'ला दाखवणार हिसका; बिप्लब देब यांना वादग्रस्त विधानं भोवणारत्रिपुरामध्ये भाजपानं ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर, तरुण-तडफदार विप्लव देव यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली होती. त्यांच्याकडून सगळ्यांच्याच अपेक्षा उंचावल्या असताना, एका भलत्याच विधानामुळे ते प्रकाशझोतात आले. महाभारत काळातही इंटरनेट आणि सॅटेलाइट अस्तित्वात होतं, असं अजब तर्कट त्यांनी मांडलं होतं. त्यावरून सुरू झालेली शाब्दिक चकमक थांबते न थांबते, तोच मिस युनिव्हर्स डायना हेडन हिचं जिंकणं फिक्सिंग होतं, असा दावा त्यांनी केला. त्यावरूनही खल झाला. पण, विप्लव देव स्वस्थ बसले नाहीत. तरुणांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा पान टपऱ्या उघडाव्यात, गायी पाळाव्यात, असा विचित्र सल्ला देऊन ते पुन्हा टीकेचे धनी ठरले होते.

 

टॅग्स :Biplab Debबिप्लब देवTripuraत्रिपुराChief Ministerमुख्यमंत्री