मद्यधुंद तरुणांकडून डॉक्टर व कर्मचार्यांना मारहाण
By Admin | Updated: March 8, 2015 00:30 IST2015-03-08T00:30:45+5:302015-03-08T00:30:45+5:30
कसारा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले डॉक्टर मयंक सोनी यांच्यासह त्यांच्या सहकार्यांना परिचारीकेस मारहाण करणार्या मद्यधुंद जहीर इनामदार व शहाबाज शेख यांच्यासहअन्य पाच तरुणांविरोधात कसारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़

मद्यधुंद तरुणांकडून डॉक्टर व कर्मचार्यांना मारहाण
क ारा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले डॉक्टर मयंक सोनी यांच्यासह त्यांच्या सहकार्यांना परिचारीकेस मारहाण करणार्या मद्यधुंद जहीर इनामदार व शहाबाज शेख यांच्यासहअन्य पाच तरुणांविरोधात कसारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़शुक्रवारी संध्याकाळी ५.३० च्या सुमारास कसार्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात डोक्याला मार लागला म्हणून ते उपचारासाठी आले होते़ तेव्हा डॉक्टर सोनी यांनी कशामुळे मार लागला अशी विचारणा केली तेव्हा या तरुणांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यावेळी त्यांनी त्या तरुणांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या तरुणांनी सोनी यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्या वेळी कार्यरत सिस्टर अंजली सोनावळे व ऋषीपाल गहनवाल हे मध्यस्थी करू लागले. मात्र, त्यांनाही बेदम केली. यावेळी ते मद्यधुंद अवस्थेत होते़ धुडगुस घातल्यानंतर त्यांनी पोबारा केला. या घटनेतील जखमी डॉक्टर व कर्मचारी कसारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावायस गेले असता त्या वेळी तेथील पोलीस कर्मचार्यांसह काही पुढार्यांनी त्यांना तक्रार देऊ नका, उगाच वातावरण गरम होईल,तुम्हाला खूप जड जाईल असा सल्ला देण्याचा प्रयत्न केला. परंतु, डॉक्टर व कर्मचार्यांनी दबावाला बळी न पडता त्या तरुणांविरोधात सरकारी कामात आडथळा व मारहाण, विनयभंग प्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी कसारा पोलीस निरीक्षक अजय वसावे पुढील तपास करीत आहेत.(वार्ताहर /श्याम धुमाळ)................................................वाचली - नारायण जाधव