शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Coronavirus Vaccine : Sputnik V च्या उत्पादनासाठी DGCI कडून सीरम इन्स्टीट्यूटला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 10:09 PM

Sputnik V : स्पुटनिक व्ही चं उत्पादन करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटनं मागितली होती परवानगी. सीरमनं केलाय रशियासोबत करार.

ठळक मुद्देस्पुटनिक व्ही चं उत्पादन करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटनं मागितली होती परवानगी. सीरमनं केलाय रशियासोबत करार.

Sputnik V या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या उत्पादनासाठी सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाला परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी सीरमनं भारतात या लसीच्या उत्पादनासाठी सरकारकडे परवानगी मागितली होती. दरम्यान सरकारनं आता त्यांना परवानगी दिली असून काही अटी शर्थींसह पुण्यातील हडपसर येथील प्रकल्पात या लसीचं उत्पादन केलं जाणार आहे. या लसीच्या उत्पादनासाठी सीरमनं रशियाच्या गमालेया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीसह करार केला आहे. औषध नियामक मंडळ डीजीसीएनं सीरम इन्स्टीट्यूटला भारतात स्पुटनिकच्या उत्पादनाची परवानगी दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे. यापूर्वी सीरमनं स्पुटनिक व्ही च्या लसीच्या उत्पादनासाठी अर्ज केला होता. त्यांनी तपास, चाचणी आणि अॅनालिसिस्ट करण्याची परवानगी मागितली होती. पुण्यात मुख्यालय असलेली सीरम सध्याच्या घडीला कोविशील्ड लसींचं उत्पादन करत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ऍस्ट्राझेनेकानं यासाठीचं संशोधन केलं असून निर्मितीची जबाबदारी सीरमकडे आहे. कोविशील्ड लसीच्या उत्पादनाला वेग देत असताना सीरमनं आता स्पुटनिकच्या निर्मितीसाठीदेखील अर्ज केला आहे. सध्या स्पुटनिक व्ही लसीचं उत्पादन डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजकडून करण्यात येत आहे.  सीरम जून महिन्यात कोविशील्डच्या १० कोटी डोसचं उत्पादन करणार आहे. तशी माहिती सीरमनं आधीच सरकारला दिली आहे. सीरम सध्याच्या घडीला नोवावॅक्सचीदेखील निर्मिती करत आहे. नोवावॅक्सला लवकरच अमेरिकेकडून मंजुरी मिळू शकते. रशियन लस असलेल्या स्पुटनिक व्ही लसीच्या आपत्कालीन वापरास डीसीजीआयनं एप्रिलमध्ये परवानगी दिली. स्पुटनिक व्ही लसीचे ३० लाख डोस काही दिवसांपूर्वीच रशियाहून हैदराबादला आले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतAdar Poonawallaअदर पूनावालाrussiaरशिया