अपघात प्रकरणात वाहनचालकावर गुन्हा
By Admin | Updated: July 31, 2015 23:03 IST2015-07-31T23:03:22+5:302015-07-31T23:03:22+5:30
मडगाव : भरधाव वेगाने वाहन हाकून अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी सर्वेश देसाई या वाहनचालकावर गुन्हा नोंद केला आहे. शहरातील कदंब बसस्थानकाशेजारी अपघाताची ही घटना घडली होती. देसाई याने एका महिला पादचार्याला वाहनाने ठोकर दिली होती. या महिलेचे नाव समजू शकले नसून, तिच्यावर गोमेकॉत उपचार चालू आहे. भादंसंच्या 279 व 337 कलमाखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. (प्रतिनिधी)

अपघात प्रकरणात वाहनचालकावर गुन्हा
म गाव : भरधाव वेगाने वाहन हाकून अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी सर्वेश देसाई या वाहनचालकावर गुन्हा नोंद केला आहे. शहरातील कदंब बसस्थानकाशेजारी अपघाताची ही घटना घडली होती. देसाई याने एका महिला पादचार्याला वाहनाने ठोकर दिली होती. या महिलेचे नाव समजू शकले नसून, तिच्यावर गोमेकॉत उपचार चालू आहे. भादंसंच्या 279 व 337 कलमाखाली पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतले आहे. (प्रतिनिधी)