शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
4
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
5
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
6
Video: खऱ्याखुऱ्या पोलिस काकांना पहिल्यांदाच पाहून चिमुकली भलतीच खुश, म्हणाली 'हाय फाईव्ह...'
7
कियारा अडवाणीसाठी आणण्यात आला स्पेशल केक, लेकीसोबत साजरा केला वाढदिवस; म्हणाली...
8
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
9
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
10
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
11
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
12
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
13
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
14
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
15
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
16
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
17
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
18
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
19
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

हातात बंदूक, खांद्यावर खाट; गर्भवती महिलेला जवानानं पोहोचवलं रुग्णालयात, लोक म्हणाले, हा तर Real Hero

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 17:42 IST

एका सर्च ऑपरेशनदरम्यान प्रसूती वेदना होत असलेल्या गर्भवती महिलेल्या डिआरजीच्या जवानानं खाटेवर ठेवून पोहोचवलं रुग्णालयात. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नक्षलग्रस्त छत्तीसगडमध्ये डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्ड फोर्सच्या जवानांनी मानवतेचं दर्शन घडवून दिलं आहे. दंतेवाडा (Dantewada) येथे शोध मोहिमेदरम्यान, प्रसूती वेदना होत असलेल्या एका गर्भवती महिलेला डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह फोर्सच्या (DRG) जवानाने खाटेवर उचलून रुग्णालयात नेले. ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वजण जवानाचं कौतुक करत आहेत.

या ठिकाणी तैनात असलेले जवान कायमच लोकांची मदत करत असतात. आता असंच एक प्रकरण दंतेवाडातील गाव रेवाली येथून समोर आलं आहे. या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावत असलेल्या डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह फोर्सच्या जवानानं गर्भवती महिलेलं खाटेवरून रुग्णालयात पोहोचवलं. दरम्यान, नक्षलवाद्यांनी अनेक ठिकाणी रस्त्यात अडथळे निर्माण केले होते. यादरम्यान महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. परंतु रस्त्यांमध्ये अडथळे असल्याकारणानं रुग्णवाहिकेला पोहोचणं शक्य नसल्याचं तिच्या पतीला सांगण्यात आलं. यानंतर जवानांनी खाटेलाच स्ट्रेचरचं रुप दिलं आणि जवळपास ३ किलोमीटर लांबपर्यंत पोहोचवलं. या ठिकाणी डीआरजीचं वाहन थांबवण्यात आलं होतं. त्यातून महिलेला ९० किमी लांब पलनार येथे रुग्णालयात नेण्यात आलं. आता बाळ आणि महिला दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. दरम्यान नेटकऱ्यांनही जवनाचं कौतुक करत याला रिअल हिरो असं म्हटलं आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाnaxaliteनक्षलवादी