शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
3
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
4
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
5
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
6
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
7
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
8
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
9
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
10
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
11
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
12
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
14
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
15
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
16
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
17
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
18
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
19
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
20
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
Daily Top 2Weekly Top 5

जय हो! भारतानं जगाला दाखवली ताकद, ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ मिसाइलची यशस्वी चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 19:53 IST

भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आज मोठं यश प्राप्त झालं आहे.  भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज अंदमान-निकोबार बेटांवर जमिनीवरुन मारा करणाऱ्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

पोर्ट ब्लेअर-

भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आज मोठं यश प्राप्त झालं आहे.  भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं (Diffence Research and Development Organization) आज अंदमान-निकोबार बेटांवर जमिनीवरुन मारा करणाऱ्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. क्षेपणास्त्र चाचणी पाहण्यासाठी एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी आणि इतर संरक्षण अधिकारी उपस्थित होते. क्षेपणास्त्रानं आपल्या लक्ष्यावर अचूक मारा केल्याची माहिती संरक्षण अधिकाऱ्याने दिली आहे. 

एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल अभिनंदन केलं. ऑपरेशनल तयारीचा आढावा घेण्यासाठी ते अंदमान आणि निकोबार बेटावर उपस्थित होते. यापूर्वी, ८ डिसेंबर २०२१ रोजी, ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या एअर व्हर्जनची हवाई दलाच्या लढाऊ विमान सुखोई-30MK-1 मध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली होती. मिसाइलनं निर्धारित मानकांची पूर्तता करत क्षेपणास्त्रानं शत्रूचं ठिकाण नष्ट केलं होतं. सुखोई-३० एमके-१ फायटर जेटमध्ये बसवण्यात आलेले ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी स्तरावर विकसित करण्यात आलं आहे.

दुसरीकडे, भारतीय हवाई दलासाठी ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्राचं अपग्रेडेड एअर लॉन्च व्हर्जन तयार केलं जात आहे. त्याची रेंज 800 किमी असेल. म्हणजेच आपली लढाऊ विमानं हवेत असताना एवढ्या दूरवरून शत्रूचं स्थान नष्ट करू शकतील. भारत आता नव्या रणनीतीनुसार क्षेपणास्त्रांची रेंज सातत्यानं वाढवत आहे. फक्त एका सॉफ्टवेअर अपग्रेडसह, क्षेपणास्त्राची श्रेणी 500 किमीनं वाढते. ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे भारतीय हवाई दलाच्या 40 सुखोई-30 MKI लढाऊ विमानांवर तैनात करण्यात आली आहेत. ही क्षेपणास्त्रं अत्यंत अचूक आणि शक्तिशाली असून शत्रूच्या तळांना पूर्णपणे नष्ट करू शकतात.

टॅग्स :DRDOडीआरडीओIndian Armyभारतीय जवानindian air forceभारतीय हवाई दलIndiaभारत