श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांची समाजाशी नाळ जोडाली जाते : डी. के. गायकवाड
By Admin | Updated: January 31, 2017 02:06 IST2017-01-31T02:06:17+5:302017-01-31T02:06:17+5:30
रुकडी / माणगाव : राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये असलेला अहंकार गळून पडतो आणि त्याची नाळ समाजाबरोबर जोडली जाते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड यांनी केले. ते चोकाक येथे राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय रुकडीच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे होते.

श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांची समाजाशी नाळ जोडाली जाते : डी. के. गायकवाड
र कडी / माणगाव : राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये असलेला अहंकार गळून पडतो आणि त्याची नाळ समाजाबरोबर जोडली जाते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड यांनी केले. ते चोकाक येथे राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय रुकडीच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या समारोपावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे होते.चोकाक येथे हे शिबिर सात दिवस सुरू होते. शिबिराचे उद्घाटन माजी उपसभापती अविनाश बनगे यांच्या हस्ते झाले. शिबिराच्या दरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे यांनी समाजाचे वैचारिक प्रबोधन करण्याकरिता कार्यरत राहण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.शिबिरामध्ये डॉ. एम. ए. पाटील यांचे जलसाक्षरता काळाची गरज, डॉ. प्रदीप ढवळे आयुर्वेद एक जीवनशैली, प्रशांत गुरव व पंकज पाटील यांचे कॅशलेस व्यवहाराचे स्वरूप व फायदे, अरुंधती पाटील सेंद्रिय शेती आणि विनायक मुरदुंडे यांचे योग आणि आरोग्य या विषयावर मार्गदर्शन झाले. श्रमसंस्कारातून चोकाक येथील वृक्षारोपण, पाईपलाईन व नागरिकांना कॅशलेस संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. अवयवदानाबाबत जनजागृती फेरी व पथनाट्याचे नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रम अधिकारी उत्तम पाटील यांनी कार्यक्रमाचा आढावा घेतला. रूपाली भोसले, आफ्रिन मुजावर, प्राजक्ता मोहिते, आकाश पाटील, रोहित कांबळे, रोहन कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.शिबिर यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत सांगावे, दीपक निकम, स्वप्निल सावंत, कृष्णात यादव, सुरज सुतार यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रम अधिकारी डॉ. लता मोरे यांनी आभार, तर सूत्रसंचालन नूरजहा जमादार हिने केले.