डॉ. झाकीर नाईक यांच्या समर्थनार्थ श्रीनगरमध्ये आंदोलन
By Admin | Updated: July 8, 2016 13:42 IST2016-07-08T13:42:10+5:302016-07-08T13:42:10+5:30
दहशतवादाला खतपाणी घालण्याचा आरोप असलेले डॉ. झाकीर नाईक यांच्या समर्थनार्थ शुक्रवारी जम्मू-काश्मिरची राजधानी श्रीनगरमध्ये आंदोलन झाले.

डॉ. झाकीर नाईक यांच्या समर्थनार्थ श्रीनगरमध्ये आंदोलन
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ८ - दहशतवादाला खतपाणी घालण्याचा आरोप असलेले डॉ. झाकीर नाईक यांच्या समर्थनार्थ शुक्रवारी जम्मू-काश्मिरची राजधानी श्रीनगरमध्ये आंदोलन झाले. काही मुस्लिमांनी फलक हाती घेऊन झाकीर नाईक यांचे समर्थन केले. बांगलादेशातील ढाका शहरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर डॉ. झाकीर नाईक तपासयंत्रणांच्या रडारवर आहेत.
ढाका हल्ल्यातील अतिरेक्याने आपल्याला झाकीर नाईकच्या भाषणातून प्रेरणा मिळाल्याचे चौकशीत सांगितले. तेव्हापासून नाईक हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांना डॉ. नाईक यांची भाषणे तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शिवसेनेने डॉ. नाईक व त्यांच्या संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे. इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक डॉ. झाकीर नाईक यांची भाषणे तपासण्याचे काम सध्या सुरु आहे.
Jammu and Kashmir: Protest held in Srinagar in support of #ZakirNaikpic.twitter.com/Qgo8Fth7hH
— ANI (@ANI_news) July 8, 2016