शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारणीची प्रक्रिया सुरू, 'ही' जागा जवळपास निश्चित...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 17:51 IST

Manmohan Singh Memorial: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी केंद्र सरकारने काही जागा सुचवल्या आहेत.

Manmohan Singh Memorial: देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे बुधवार, 26 डिसेंबर 2024 रोजी निधन झाले, तर शनिवारी दिल्लीतील निगमबोध घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता त्यांचे स्मारक उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्र सरकारने स्मारकासाठी मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांना काही जागांचे पर्याय देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने कुटुंबाला दिलेल्या पर्यायांमधून एक जागा निवडण्यास सांगितले आहे. एकदा जागेची निवड झाली की, लगेच स्मारकाचे काम सुरू होईल. मात्र, यासाठी आधी ट्रस्ट तयार करणे आवश्यक आहे. नव्या धोरणानुसार जमिनीचे वाटप ट्रस्टलाच करता येणार आहे. ट्रस्टची स्थापना झाल्यानंतरच स्मारकाच्या उभारणीचे काम सुरू करता येईल.

एक ते दीड एकर जमीन ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर ती जमिनीसाठी अर्ज करेल. जमीन वाटप केल्यानंतर CPWD सोबत सामंजस्य करार केला जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी राजघाट, राष्ट्रीय स्मारक किंवा किसान घाटाजवळ एक ते दीड एकर जमीन दिली जाऊ शकते.

अधिकाऱ्यांनी स्मारकाला भेट दिलीस्मारकासाठी नगरविकास मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी राजघाट आणि आसपासच्या भागाला भेट दिली आहे. नेहरू-गांधी घराण्यातील नेत्यांच्या समाधीजवळ मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा दिली जाण्याची शक्यता आहे. याच ठिकामी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि संजय गांधी यांच्या समाधी आहेत.

काँग्रेसचा आरोप भाजपचे प्रत्युत्तरमनमोहन सिंग यांच्या स्मारकाबाबत काँग्रेस सरकारवर सातत्याने टीका करत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी आणि स्मारकासाठी जागा न देणे हा भारताच्या पहिल्या शीख पंतप्रधानांचा जाणीवपूर्वक अपमान आहे, असा आरोप अलीकडेच काँग्रेसने केला होता. त्यावर भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले होते की, कोणताही अपमान झालेला नाही. येत्या काही दिवसांत स्मारक नक्कीच उभारले जाईल. आम्ही नेहमीच मनमोहन सिंग यांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे.

टॅग्स :Manmohan Singhडॉ. मनमोहन सिंगdelhiदिल्लीcongressकाँग्रेसBJPभाजपा