शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

डीपीसी- भाग ३

By admin | Updated: February 18, 2015 23:54 IST

फोटो- बावनकुळे, मुळक

फोटो- बावनकुळे, मुळक
डीपीसीच्या निधीवरून
आजी-माजी मंत्र्यांत जुंपली
नागपूर : २०१५-१६ च्या डीपीसीच्या निधीत फक्त ११ टक्के वाढ करण्यात आली. ही वाढ आघाडी सरकारच्या काळातील वाढीपेक्षा कमी असली तरी पालकमंत्री व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांचा आक्षेप फेटाळून लावला आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आघाडी सरकारने अतिरिक्त २५ कोटी दिले होते, असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे तर २०१२-१३ मध्ये ११७ कोटीहून तब्बल १६० कोटी रुपये मंजूर करण्यात आले त्यावेळी कुठली निवडणूक होती, असा सवाल काँग्रेस नेते माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी केला आहे. डीपीसीच्या निधीवरून आजी- माजी मंत्र्यांमध्ये जुंपली आहे.
पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, गेल्या वर्षीचा आराखडा २०० कोटींचाच होता. निवडणूक तोंडावर होती. त्यामुळे आघाडी सरकारने विशेष बाब म्हणून फक्त त्या वर्षासाठी अतिरिक्त २५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे निधी २२५ कोटींवर पोहचला. मूळ २०० कोटींपैकी २० कोटी रुपयांची गृहनिर्माण योजना रद्द झाली. त्यामुळे प्रत्यक्षात १८० कोटी रुपयेच मिळाले. यावर्षी आपण हा आराखडा २५० कोटींवर नेला. त्यामुळी डीपीसीच्या निधीत २५ कोटींची नव्हे तर तब्बल ७० कोटींची वाढ करण्यात आली आहे, असा दावाही बावनकुळे यांनी केला.
माजी राज्यमंत्री व डीपीसीचे सदस्य आ. राजेंद्र मुळक यांनी बावनकुळे यांचा हा दावा खोडून काढला. ते म्हणाले, नागपूर विदर्भाची उपराजधानी आहे. यात शहराचा, ग्रामीण भागाचा झपाट्याने विस्तार होत आहे. मुख्यमंत्री, अर्थमंत्री विदर्भाचे आहेत. अशात नागपूर जिल्हा नियोजन समितीचे आकारमान ३५० कोटीपर्यंत जाईल, असे अपेक्षित होते. पण आज अपेक्षाभंग झाला. डीपीसीच्या निधीत आघाडी सरकारने केलेल्या वाढीपेक्षाही कमी वाढ करण्यात आली. २०१२-१३ मध्ये आपण अर्थराज्यमंत्री असताना डीपीसीचा निधी ११७ कोटींहून १६० कोटींवर नेला. त्यावेळी कुठली निवडणूक होती. विदर्भाबाहेरील मुख्यमंत्री व वित्तमंत्री असतानाही नागपूरसाठी भरीव निधी मिळवण्यात आम्हाला यश आले. हे काम सध्या सत्तेत असलेले विदर्भातील दिग्गज नेते का करू शकले नाहीत. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरच्या निधीत वाढ करण्याचा विषय मुख्यमंत्र्यांसमोर मांडावा. आम्हीही त्याचे समर्थन करू. विदर्भाच्या नेत्यांकडून विदर्भावर असा अन्याय होऊ नये, असा चिमटाही मुळक यांनी काढला.