'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्याने दाम्पत्त्याची आत्महत्या
By Admin | Updated: June 26, 2015 13:41 IST2015-06-26T13:41:33+5:302015-06-26T13:41:33+5:30
मोबाईलमध्ये पत्नीसोबतचे काही खासगी व्हिडीओ व्हायरल झाल्याने मध्यप्रदेशमधील देवास जिल्ह्यातील एका दाम्पत्त्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

'तो' व्हिडीओ व्हायरल झाल्याने दाम्पत्त्याची आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
देवास, दि. २६ - मोबाईलमध्ये पत्नीसोबतचे काही खासगी व्हिडीओ व्हायरल झाल्याने मध्यप्रदेशमधील देवास जिल्ह्यातील एका दाम्पत्त्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. संबंधीत दाम्पत्त्याचा व्हिडीओ मोबाईल हरवल्यानंतर लीक झाला असून मोबाईलमध्ये अशा खासगी गोष्टी ठेवणे किती महागात पडू शकते हे या घटनेवरुन दिसते.
देवास जिल्ह्यातील सोमगाव येथे राहणारा राजू (वय ३५) याने त्याच्या मोबाईलमध्ये पत्नीसोबतच्या संबंधांचे चित्रीकरण केले होते. दिड वर्षांपूर्वी राजूचा मोबाईल फोन हरवला होता. हा मोबाईल संतोष नामक तरुणाला सापडला होता. मात्र मोबाईल सुरु होत नसल्याने संतोषने मोबाईल मुकेश नामक मित्राला दिला. मुकेशने हा मोबाईल चालू केला त्यांना राजू व त्याच्या पत्नीचा व्हिडीओ आढळला. त्यांनीच हा व्हिडीओ व्हायरल केला. यामुळे राजू व त्याच्या पत्नीची गावात नाचक्की झाली होती. यानंतर गुरुवारी राजू व त्याच्या पत्नीने विषप्राशन करुन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिस तपास सुरु आहे.