डॉर्नियर २२८ विमाने देशांतर्गत उड्डाणांसाठीही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 04:01 IST2017-12-27T04:01:29+5:302017-12-27T04:01:39+5:30
नवी दिल्ली : हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) बनवलेल्या ‘डॉर्नियर २२८’ प्रकारच्या विमानातून देशांतर्गत प्रवास करता येईल. नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) तशी परवानगी दिली आहे.

डॉर्नियर २२८ विमाने देशांतर्गत उड्डाणांसाठीही
नवी दिल्ली : हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) बनवलेल्या ‘डॉर्नियर २२८’ प्रकारच्या विमानातून देशांतर्गत प्रवास करता येईल. नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) तशी परवानगी दिली आहे. हे विमान १९ आसनी असून आतापर्यंत त्याचा वापर केवळ संरक्षण दलांसाठीच केला जायचा. व्यावसायिक उड्डाणांसाठी देशात बनवलेले हे पहिले विमान असेल. एचएएल ही विमाने आता भारतातील विमान कंपन्यांनाही विकू शकेल व त्या त्यांचा वापर मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी उडाण योजनेखाली देशांतर्गत उड्डाणांसाठीही वापरू शकतील, असे डीजीसीएतील वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.
या विमानांच्या वापरासाठी कंपन्यांना काही विशेष लाभ दिले जातील. भारतातील विमान कंपन्यांना ही विमाने विकण्याबरोबरच एचएएल ही विमाने नागरी उड्डाणांसाठी शेजारच्या देशांनाही (नेपाळ, श्रीलंका) विकू शकतील.