doors of discussion still open says union minister prakash javadekar on farmer protest | दिल्ली हिंसाचार प्रकरणावर मोदी सरकारची पहिली प्रतिक्रिया; मराठमोळ्या मंत्र्यांचं मोठं विधान

दिल्ली हिंसाचार प्रकरणावर मोदी सरकारची पहिली प्रतिक्रिया; मराठमोळ्या मंत्र्यांचं मोठं विधान

नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीतल्या वेशीवर केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी काल ट्रॅक्टर मोर्चा काढला. या मोर्चाला हिंसक वळण लागलं. लाल किल्ल्यासह अनेक भागांमध्ये आंदोलक आणि पोलीस एकमेकांना भिडले. या चकमकीत अनेक जण जखमी झाले. त्यामुळे गृह मंत्रालय हिंसाचाराला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलक शेतकरी आणि सरकारमधील संवाद संपून प्रश्न आणखी चिघळ्याची शक्यता निर्माण झाली. मात्र केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एक दिलासादायक विधान केलं आहे.

अमित शहा इन ऍक्शन! गृह मंत्रालय मोठी कारवाई करण्याच्या तयारीत; पुढील काही तास महत्त्वाचे

चर्चेचे दरवाजे बंद झाल्याचं आम्ही कधीही म्हटलेलं नाही, असं जावडेकर यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च आणि त्यात झालेला हिंसाचार याबद्दल गेल्या २४ तासांत मोदी सरकारकडून प्रतिक्रिया आलेली नव्हती. या पार्श्वभूमीवर जावडेकर यांनी केलेलं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना दिल्लीत झालेल्या हिंसाचाराबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी चर्चेचे दरवाजे बंद झाल्याचं तुम्ही ऐकलंत का? जेव्हा काही होईल, तेव्हा तुम्हाला सांगू, असं उत्तर जावडेकर यांनी दिलं.

शेतकऱ्यांबद्दलचं विधान भोवलं; ६ दिग्गज ब्रँण्ड्सकडून कंगना रणौतसोबतचे करार रद्द

चर्चेच्या ११ फेऱ्या निष्फळ
कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत सरकारनं ११ वेळा बैठक घेतल्या आहेत. मात्र या सगळ्या बैठका निष्फळ ठरल्या. दीड वर्षांसाठी कृषी कायद्यांना स्थगिती देईल, अशी भूमिका केंद्र सरकारनं घेतली. मात्र ही ऑफर शेतकरी संघटनांनी अमान्य केली. तिन्ही कायदे रद्द करा या मागणीवर शेतकरी संघटना ठाम आहेत. तर कायदे मागे घेणार नसल्याची भूमिका केंद्रानं घेतली आहे. त्यामुळे ११ बैठकांनंतरही तोडगा निघालेला नाही.

खळबळजनक! "काठ्या घेऊन रॅलीत या"; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा व्हिडिओ व्हायरल

गृह मंत्रालय ऍक्शनमध्ये
प्रजासत्ताक दिनी हिंसाचार घडवून आणणाऱ्या, त्यात सहभाग असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गृह मंत्रालयाकडून दिल्ली पोलिसांसह शेजारील राज्यांच्या पोलिसांना देण्यात आले आहेत. काल झालेल्या हिंसाचाराची चौकशी दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा करेल. यासाठी आज संध्याकाळपर्यंत एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात येईल. हिंसाचाराआधी झालेल्या घडामोडी, त्यानंतर झालेला हिंसाचार या संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी पथकाकडून केली जाईल.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: doors of discussion still open says union minister prakash javadekar on farmer protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.