दौंडला रेल्वेस्थानकातील प्रश्न लागणार मार्गी

By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:31+5:302015-08-31T00:24:31+5:30

दौंड : रेल्वेस्थानकातील रेल्वेचे विविध प्रश्न मंजूर झाले असून लवकर हे सर्व प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य विकास देशपांडे यांनी दिली.

Doond will have a question in the railway station | दौंडला रेल्वेस्थानकातील प्रश्न लागणार मार्गी

दौंडला रेल्वेस्थानकातील प्रश्न लागणार मार्गी

ंड : रेल्वेस्थानकातील रेल्वेचे विविध प्रश्न मंजूर झाले असून लवकर हे सर्व प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य विकास देशपांडे यांनी दिली.
यासंदर्भात दौंड पुणे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया आणि रेल्वेचे सोलापूर विभागीय अधीक्षक दुबे यांच्यात बैठक झाली. येथील जुन्या पादचारी पुलाच्या दोन्ही बाजू वाढविण्यास मंजुरी मिळाली आहे. फलाट क्र. ६ च्या बाजूस नवीस फलाट तयार करणे, रेल्वेस्थानकाच्या सर्व बाजूस असलेल्या रेल्वे हद्दीतील सर्व्हिस रस्त्याचे नूतनीकरण आणि परिसरात पथदिवे बसविण्यात येणार आहेत. रेल्वेस्थानकात सर्वत्र सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता तिकीट खिडक्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वेस्थानकात नामनिर्देशक फलक लावण्यात येईल आणि नवीन पादचारी पुलाजवळील गाड्यांची स्थिती दर्शविणारे इलेक्ट्रॉनिक्स फलक बसविण्यात येणार आहेत. रेल्वे दवाखान्याच्या बाजूस दुचाकी, चारचाकी वाहनतळ करण्यात येणार असून याबाबतीत लवकरच निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पुणे आणि मनमाडकडून येणार्‍या सर्व गाड्या सिग्नलजवळ न थांबता त्या थेट रेल्वेस्थानकात घेण्यात येतील. शताब्दी एक्स्प्रेस, सोलापूर सीएसटीएम एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक विशाखाप˜णम एक्स्प्रेस या गाड्यांना रेल्वेस्थानकात थांबा देण्यात येईल, यांसह अन्य काही महत्त्वाच्या बाबींवर सकारात्मक चर्चा झाली. लवकरच वरील सर्व विषय अमलात आणले जाणार आहेत. या बैठकीला प्रेमसुख कटारिया, दौंडचे स्टेशन प्रबंधक आर. बी. सिंह, विकास देशपांडे, गणेश शिंदे, मायकल ॲन्थोनी, सुरेश मूलचंदाणी उपस्थित होते.
-------------
फोटो ओळ : दौंड रेल्वेस्थानकातील विविध समस्यांचे निवेदन सोलापूर येथे रेल्वे अधिकार्‍यांना देताना प्रेमसुख कटारिया व मान्यवर.
29082015-िं४ल्लि-18
------------
०००००

Web Title: Doond will have a question in the railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.