शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तूर्तास राजीनामा नको; शपथविधीनंतर चर्चा करू, गृहमंत्री अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना सबुरीचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 06:25 IST

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पदमुक्त होऊन जनादेश यात्रा काढून पुढचे तीन महिने महाराष्ट्र पिंजून काढण्याचा मनोदय फडणवीस यांनी व्यक्त केला. 

नवी दिल्ली : तूर्तास उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊ नका. त्यावर शपथविधीनंतर चर्चा करू. चार महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप तयार करून कामाला लागा, असा निर्देशवजा सबुरीचा सल्ला भाजपश्रेष्ठी आणि माजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज देवेंद्र फडणवीस यांना दिला.

लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव घेऊन दिल्लीत आलेले फडणवीस यांनी शाह यांची त्यांच्या निवासस्थानी गुरुवारी मध्यरात्रीनंतर तसेच आज सायंकाळी दुसऱ्यांदा भेट घेतली. ही चर्चा अर्धा तास चालली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पदमुक्त होऊन जनादेश यात्रा काढून पुढचे तीन महिने महाराष्ट्र पिंजून काढण्याचा मनोदय फडणवीस यांनी व्यक्त केला. 

फडणवीस आज काय बोलणार?विधानसभा आणि विधान परिषदेतील भाजपच्या सर्व आमदारांची बैठक उद्या दुपारी मुंबईत होत आहे या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करतील. फडणवीस हे राजीनाम्याच्या त्यांच्या प्रस्तावाबाबत पक्षश्रेष्ठींनी त्यांना काय सांगितले, याबाबतची माहिती या बैठकीत देणार आहेत.

महाजन यांचा इन्कार फडणवीस यांच्या जागी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे उपमुख्यमंत्री होणार, असे वृत्त काही वाहिन्यांनी दिले. मात्र, महाजन यांनी त्याचा इन्कार केला. फडणवीस हेच उपमुख्यमंत्रिपदी कायम राहतील; आमचा तसाच आग्रह आहे, असे ते म्हणाले.

मध्यरात्री घेतली भेटराजीनामा दिल्यास कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम होईल, असे अमित शाह यांनी फडणवीस यांना सांगितल्याचे समजते. गुरुवारी फडणवीस यांनी मध्यरात्रीनंतर शाह यांची भेट घेतली तेव्हाही त्यांच्या प्रस्तावावर निर्णय झाला नव्हता.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmit Shahअमित शाहLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४