डोंगरगाव सरपंचपदी गायकवाड

By Admin | Updated: August 23, 2015 20:40 IST2015-08-23T20:40:15+5:302015-08-23T20:40:15+5:30

लोणीकंद : डोंगरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बाबासाहेब सोपान गायकवाड व उपसरपंचपदी गंगूबाई एकनाथ वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली.

Dongargaon Sarpanchapadi Gaikwad | डोंगरगाव सरपंचपदी गायकवाड

डोंगरगाव सरपंचपदी गायकवाड

णीकंद : डोंगरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बाबासाहेब सोपान गायकवाड व उपसरपंचपदी गंगूबाई एकनाथ वाघमारे यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी जालिंदर काळे यांनी निवड जाहीर केली. त्यांना ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब गव्हाणे यांनी मदत केली. निवडीनंतर गावातून मिरवणूक काढण्यात आली. गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली.
विद्यमान सरपंच बाबासाहेब गायकवाड म्हणाले, की गावातील प्रत्येक माणसांना मदतीचा हात देऊ; तसेच गावच्या चौफेर विकासाला प्राधान्य देऊ. बिनविरोध निवडीसाठी माजी सरपंच पांडुरंग गायकवाड, शामशेठ शिंदे, रामदास कामठे, संतोष गायकवाड आदींनी प्रयत्न केले.
फोटो - डोंगरगाव निवडीनंतर ग्रामस्थांनी सत्कार केला.
०००००

Web Title: Dongargaon Sarpanchapadi Gaikwad