शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

खासदारकीचा संपूर्ण पगार दान, गौतम गंभीर करणार नवनिर्माण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 16:05 IST

गौतम गंभीरने नुकतेच गीता कॉलोनी श्मशान घाट येथील परिसराचा दौरा केला.

नवी दिल्ली - टीम इंडियाचा धडाकेबाज माजी फलंदाज आणि नवनिर्वाचित खासदारगौतम गंभीर आपली संपूर्ण पगार समाज कार्यासाठी दान करणार आहे. खासदार म्हणून मिळणार पगार दिल्लीतील स्मशानभूमीच्या नवनिर्माणासाठी देणार आहे. गौतम गंभीर ज्याप्रमाणे एक आक्रमक फलंदाज होता, तितकाच संवेदनशील माणूस आहे. नुकतेच राजकीय मैदानावर फटकेबाजी करण्यास गौतम गंभीरने सुरुवात केली आहे. 

गौतम गंभीर आपल्या समाजकार्यासाठी आणि सामाजिक जाणिवेतून केलेल्या कामासाठी नेहमीच ओळखला जातो. आता, खासदार झाल्यानंतरही तो जबाबदारीने आपलं काम करताना दिसत आहे. गौतमने नुकतेच गीता कॉलोनी श्मशान घाट येथील परिसराचा दौरा केला. त्यामुळे या स्मशान भूमिपासूनच कामाची सुरुवात करण्याचा निर्णय गौतमने घेतला आहे. ईस्ट दिल्लीतील सर्वच स्मशान भूमी आणि तेथील परिसराचे पुनर्निर्माणासाठी करण्याचा निर्णय गौतमने घेतला आहे. त्यासाठी, आपला खासदारकीचा संपूर्ण पगार गौतम गंभीर देणार आहे. परिसरातील काही पर्यावरणप्रेमी मित्र आणि संघटनांशीही गौतम संपर्कात असून पर्यावरणपूरक कामे करण्यास तो उत्सुक आहे. 

स्मशान घाट येथील परिसरात शेड बसवणे, पाणी, नवीन प्लॅटफॉर्म, लोकांना बसण्यासाठी बेंच यांसह इतरही कामे प्राधान्यक्रमाने आहेत. गौतमने 9 जुलै रोजी ट्विट करुन मी खासदार म्हणून मला मिळणारा पगार समाजकार्यासाठी देणार असल्याचे म्हटले होते. राजकारण हे शहरातील लोकांची मदत करण्यासाठी मी निवडलेला एक मार्ग आहे. त्यामुळेच, एक खासदार म्हणून मला मिळणारा पगार मी, माझ्या मतदारसंघातील लोकांच्या कल्याणासाठी आणि सुख-सुविधांसाठी वापरणार असल्याचे गौतमने ट्विट करुन म्हटले आहे. त्यामुळेच ईस्ट दिल्लीच्या विकासासाठी, येथील स्मशान भूमीच्या पुनर्निर्माणासाठी या पैशाचा वापर केला जाईल, असेही गौतमने म्हटले आहे. 

टॅग्स :Gautam Gambhirगौतम गंभीरMember of parliamentखासदारdelhiदिल्लीBJPभाजपा