शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Donald Trump Visit: २२ कि.मी.च्या रोड शोमध्ये उत्साहाला आले उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 01:56 IST

ढोल-ताशांचा गजर आणि शंखनाद; कलाकारांनी लक्ष वेधून घेतले

अहमदाबाद : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळापासून २२ कि.मी. रोड शोला सुरुवात केली तेव्हा लोकांच्या उत्साहाला उधाण आले होते.यावेळी साबरमती आश्रमात पोहोचण्यापर्यंत ट्रम्प आणि मोदी हे वेगवेगळ्या वाहनात दिसून आले. तत्पूर्वी, ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया यांंना घेऊन आलेले एअर फोर्स वन विमान सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी लँड झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ट्रम्प यांचे स्वागत करण्यासाठी सकाळी अहमदाबाद विमानतळावर पोहोचले होते.ट्रम्प आणि मोदी यांनी विमानतळावरूनच रोड शोला सुरुवात केली. हा रोड शो भव्य होण्यासाठी अहमदाबाद महापालिकेने कोणतीही कसर सोडली नाही. देशातील विविध डान्स ग्रुप आणि गायक यांच्या आविष्काराने रोड शोला आणखीच रंगत आली. रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोक स्वागतासाठी उभे होते.मोटेरा स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी लोक उभे होते आणि हातात तिरंगा व अमेरिकी ध्वज घेऊन ट्रम्प यांचे स्वागत करत होते. विमानतळ ते मोटेरा स्टेडियम या रस्त्यांनजिक नर्तक, गायक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत होते. अनेक ठिकाणी ढोल वाजत होते तर शंखनाद लक्ष वेधून घेत होता. ट्रम्प यांनी काळ्या रंगाचा सूट आणि पिवळ्या रंगाचा टाय परिधान केला होता. मेलानिया ट्रम्प यांनी पांढरा जम्पसूट परिधान केला होता. या मार्गात ५० स्टेज उभारण्यात आले होते.अतिथी देवो भव:सप्टेंबर २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौºयात ह्युस्टनमध्ये हाउडी मोदी कार्यक्रमानंतर दोन्ही नेत्यांमध्ये संबंध आणखी दृढ झाले आहेत. भारतात पोहोचण्यापूर्वी ट्रम्प यांनी टष्ट्वीट केले की, भारतात येण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. काही वेळातच सर्वांशी चर्चा करू. याचे उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी टष्ट्वीट केले की, ‘अतिथी देवो भव:’

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पNarendra Modiनरेंद्र मोदी