शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
3
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
4
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
5
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
6
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
7
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
8
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
9
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
10
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
11
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
12
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
13
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
14
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
15
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
16
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
17
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
18
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
19
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
20
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

Donald Trump Visit: सचिन ते विराट अन् शोले ते डीडीएलजे; ट्रम्प यांची 'मोटेरा'वर 'बॅटिंग'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 15:31 IST

Donald Trump Visit: आज तुम्ही जे प्रेम आणि आदरातिथ्य दाखवले ते आमच्या मनात कायम राहील.

अहमदाबाद - भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दुपारी अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर उपस्थितांना संबोधित केले. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील विविधतेत एकतेचा उल्लेख केला. तसेच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली या क्रिकेटपटूंसह बॉलिवूड आणि शोले, डीडीएलजे या सुप्रसिद्ध चित्रपटांचा उल्लेख करून उपस्थितांची मने जिंकली. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आज तुम्ही जे प्रेम आणि आदरातिथ्य दाखवले ते आमच्या मनात कायम राहील. हे मोटेरा स्टेडियम खूप सुंदर आहे. येथील बॉलिवूडची जगभरात ओळख आहे. तसेच   दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे आणि शोलेसारख्या चित्रपटांचा आस्वाद जगभरातील अनेक लोकांनी घेतला आहे.''असे ट्रम्प यांनी सांगितले. 

''काही महिन्यांपूर्वी जेव्हा मोदी ह्युस्टन येथे आले होते. तेव्हा त्यांचे स्वागत हाऊडी मोदी कार्यक्रमात फुटबॉल स्डेडियमवर करण्यात आले होते. आज जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्डेडियम असलेल्या मोटेरावर माझे स्वागत करण्यात आले. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारख्या खेळाडूंची ओळख जगभरात आहे.'' असे ट्रम्प म्हणाले. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भाषणात दिवाळी आणि होळी या सणांचाही उल्लेख केला. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचाही आपल्या भाषणात उल्लेख केला. तसेच भारतातील विविधतेमधील एकता संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या

Donald Trump Visit: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भाषणात पाकिस्तानचा उल्लेख करतात तेव्हा...

मोदी-ट्रम्प 'झप्पी'नंतर Memesची 'थप्पी', ही पाहा 'इक्कीस फोटो की सलामी'!

Donald Trump's Visit : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पर्सनल लाइफमधील या गोष्टींबाबत भारतीय गुगलवर करताहेत सर्च

Donald Trump ज्या सूटमध्ये राहणार तो पाहायचाय?; एका रात्रीची भाडं 'फक्त'....

तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्य यांचे भारतात आगमन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजशिष्टाचाराला फाटा देत ट्रम्प यांची गळाभेट घेऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर तिन्ही दलांच्या जवानांनी ट्रम्प यांना मानवंदना दिली. तसेच विविध राज्यातील सांस्कृतिक पथकांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्यांमधून ट्रम्प यांचे स्वागत करण्यात आले.  त्यानंतर  डोनाल्ड ट्रम्प यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना महात्मा गांधींच्या आश्रमाबाबत माहिती दिली. तसेच ट्रम्प यांनी आश्रमातील चरख्यावर सूतकताई केली. 

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited StatesअमेरिकाIndiaभारत