Donald Trump accorded ceremonial welcome guard of honour at Rashtrapati Bhavan kkg | ट्रम्प यांचे राष्ट्रपती भवनात शाही स्वागत; २१ तोफांची दिली सलामी

ट्रम्प यांचे राष्ट्रपती भवनात शाही स्वागत; २१ तोफांची दिली सलामी

नवी दिल्ली : हॉटेल मौर्यामधून सकाळी सव्वादहाच्या सुमारास राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प हे राष्ट्रपती भवनात आले. तेथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले.

लष्कर, हवाई दल आणि नौदल या तिन्ही दलाच्या जवानांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे गार्ड आॅफ आॅनर देऊन स्वागत केले. राष्ट्रपती भवनात यावेळी शाही रेड कार्पेट टाकण्यात आले होते. यावेळी २१ तोफांची सलामीही ट्रम्प यांना देण्यात आली.

याप्रसंगी पत्नी मेलानिया, मुलगी इवांका, जावई जेरेड यांची उपस्थिती होती. संरक्षणमंत्री राजनाथसिंह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचीही यावेळी उपस्थिती होती. मेलानिया व इवांका यांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते.

Web Title: Donald Trump accorded ceremonial welcome guard of honour at Rashtrapati Bhavan kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.