Dombivali-Mumbai Local commuter inconvenience - Supriya Sule; The Railway Minister should resolve the matter immediately | डोंबिवली-मुंबई लोकलमध्ये प्रवाशांची गैरसोय - सुप्रिया सुळे; रेल्वेमंत्र्यांनी ताबडतोब तोडगा काढावा
डोंबिवली-मुंबई लोकलमध्ये प्रवाशांची गैरसोय - सुप्रिया सुळे; रेल्वेमंत्र्यांनी ताबडतोब तोडगा काढावा

नवी दिल्ली : डोंबिवली-मुंबईदरम्यान धावणाऱ्या लोकलमध्ये प्रवासी संख्या वाढल्याने गैरसोय होत असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. त्या म्हणाल्या की, काही महिन्यांपूर्वीच लोकल सुरू झाली. डोंबिवली लोकल या नावाने ही गाडी ओळखले जाते. त्यामुळे ही गाडी डोंबिवलीतून सुरू होत असल्याचे प्रथमदर्शनी वाटते. प्रत्यक्षात कल्याणचे प्रवासी त्यात आधीच बसतात. त्यामुळे डोंबिवली येईपर्यंत गाडी प्रवाशांनी भरून जाते. प्रवाशांची प्रचंड गर्दी डोंबिवली रेल्वे स्थानकावर त्यामुळे होते. शिवाय अनेकदा लोकल वेळेवर धावत नाही. त्यामुळेही मोठी गैरसोय होत असल्याचे सुळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. रेल्वे मंत्र्यांनी तातडीने ही समस्या सोडवण्यासाठी तोडगा काढावा, अशी विनंती सुळे यांनी केली.

Web Title: Dombivali-Mumbai Local commuter inconvenience - Supriya Sule; The Railway Minister should resolve the matter immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.