कुत्र्याला टू-व्हिलरला बांधलं अन् फरफटत नेलं; दिल्लीतील डोक्यात जाणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 08:18 PM2020-06-06T20:18:40+5:302020-06-06T20:20:24+5:30

एक रुग्णवाहिका दाखल झाली आणि गंभीर जखमी आणि घाबरलेल्या कुत्र्याला निवारा मिळाला.

The dog was tied to a two-wheeler and taken away; Head-on incident in Delhi | कुत्र्याला टू-व्हिलरला बांधलं अन् फरफटत नेलं; दिल्लीतील डोक्यात जाणारी घटना

कुत्र्याला टू-व्हिलरला बांधलं अन् फरफटत नेलं; दिल्लीतील डोक्यात जाणारी घटना

googlenewsNext
ठळक मुद्देकेरळमधील गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूची घटना ताजी असताना आणि या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात पसरले असताना पुन्हा प्राण्यांवरील क्रूरतेचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात, दिल्ली येथील एका अज्ञात व्यक्तीने कुत्रा दुचाकीला बांधून रस्त्यावर ओढण्याचा अमानुष निर्णय घेतला.

दिवसेंदिवस, आम्ही जनावरांच्या अत्याचाराच्या अत्याचारी घटनांबद्दल ऐकत आहोत आणि असे दिसते की प्राणि मात्रांचे उत्तरोत्तर हाल होत आहे. केरळमधील गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूची घटना ताजी असताना आणि या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात पसरले असताना पुन्हा प्राण्यांवरील क्रूरतेचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे.

या प्रकरणात, दिल्ली येथील एका अज्ञात व्यक्तीने कुत्रा दुचाकीला बांधून रस्त्यावर ओढण्याचा अमानुष निर्णय घेतला. स्थानिकांनी या घटनेची नोंद करत आरडाओरडा  केला तेव्हा कुत्र्याची सुटका झाली. स्थानिकांनी आरडाओरडा केल्यानंतर, नराधमांनी घटनास्थळावरून पळ काढला. अभिषेक जोशी या प्राणी मित्राने आणि डिजिटल मार्केटर असलेल्या या व्यक्तीने  नरक यातना भोगणाऱ्या कुत्र्याची फोटो शेअर केले आणि ते फोटो हृदयद्रावक आहे. तसेच जोशी यांनी  प्राणी प्रेमींना सांगितले की, हा कुत्रा दत्तक घेतला जाऊ शकतो आणि त्याला वाढवता येईल.
 

 

घटनेनंतर भिती व्यक्त करत जोशी म्हणाले, "कोणी विचार केला नव्हता की वाहनाचा नंबर मिळेल. कोणीतरी संजय गांधी अ‍ॅनिमल केअर सेंटर, राजा गार्डन, नवी दिल्ली यांना माहिती दिली. एक रुग्णवाहिका दाखल झाली आणि गंभीर जखमी आणि घाबरलेल्या कुत्र्याला निवारा मिळाला. " तसेच त्यांनी आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, "(त्या कुत्र्याचा) दुखापत झाल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कृपया कुणीतरी त्याला वाढवण्यासाठी घरी न्या, दत्तक घ्या आणि त्याला मानसिक, शारीरिक आरोग्य परत येईपर्यंत पालनपोषण करेल काय?"

Dawood Ibrahim Dead? : दाऊद इब्राहिमच्या मृत्यूची चर्चा, अधिकृत दुजोरा नाही; सोशल मीडियावर मेसेज-मीम्सचा पाऊस

 

Video : मास्क घातला नाही म्हणून जोधपूरमधील पोलिसाने दिला गळ्यावर पाय; नेटिझन्सना आठवला जॉर्ज फ्लॉईड

Web Title: The dog was tied to a two-wheeler and taken away; Head-on incident in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.