'तेरी मेहरबानियाँ...', मालकाचा जीव वाचवण्यासाठी वाघाशी भिडला, उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 14:32 IST2025-03-02T14:31:49+5:302025-03-02T14:32:31+5:30

Dog Tiger Fight : पंचक्रोशीत कुत्र्याच्या शौर्याचे कौतुक होत आहे.

Dog Tiger Fight : fought with tiger to save owner's life, died during treatment | 'तेरी मेहरबानियाँ...', मालकाचा जीव वाचवण्यासाठी वाघाशी भिडला, उपचारादरम्यान मृत्यू

'तेरी मेहरबानियाँ...', मालकाचा जीव वाचवण्यासाठी वाघाशी भिडला, उपचारादरम्यान मृत्यू

Dog Tiger Fight : तुम्हाला जॅकी श्रॉफचा 'तेरी मेहेरबनिया' हा चित्रपट आठवत असेलच. जेव्हा जेव्हा मानव आणि प्राण्याच्या मैत्री किंवा निष्ठेचा विषय येतो, तेव्हा सर्वात आधी डोळ्यासमोर हाच चित्रपट येतो. हा चित्रपट कुत्र्याच्या निष्ठेवर आधारित आहे. खऱ्या आयुष्यातही कुत्र्यासारखा निष्ठावान आणि प्रामाणिक दुसरा प्राणी नाही. मध्य प्रदेशातील एका घटनेने पुन्हा याची प्रचिती आली. 

येथील बांधवगड व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या एका गावातून धाडसी कुत्रा आणि त्याच्या मालकाच्या मैत्रीची कहाणी समोर आली आहे. उमरिया जिल्ह्यातील भरहुत गावात ही घटना घडली. एका गावात वाघ शिरला अन् गावकऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान आपल्या मालकाला वाचवण्यासाठी घरातील पाळीव जर्मन शेफर्ड कुत्रा चक्क वाघाशी भिडला. कुत्र्याने आपल्या प्राणाची आहुती दिली, पण मालकाला काही होऊ दिले नाही. 

दोन दिवस उपचार अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी वाघाने राखीव क्षेत्राची हद्द ओलांडली अन् भरहुत गावाजवळ शिवम बडगय्या यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांचा पाळीव कुत्रा तात्काळ मदतीला आला. कुत्र्याने सर्व शक्तीनिशी वाघाशी झुंज दिली आणि आपल्या मालकाचे प्राण वाचवले. यादरम्यान वाघाने कुत्र्याची मान जबड्याने दाबून तोडली अन् पळ काढला. घटनेनंतर शिवमने ताबडतोब कुत्र्याला पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले. 

तिथे कुत्र्यावर दोन दिवस उपचार चालले, पण शेवटी त्याचा मृत्यू झाला. शिवमने सांगितले की, हा कुत्रा गेल्या 10 वर्षांपासून त्यांच्या घरात होता. तो रोज संध्याकाळी त्याला फिरायला घेऊन जायचा. या शौर्यानंतर पंचक्रोशीतील लोक या कुत्र्याच्या शौर्य आणि निष्ठेचे कौतुक करत त्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

Web Title: Dog Tiger Fight : fought with tiger to save owner's life, died during treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.