शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! कुत्र्याला दगड मारला म्हणून मालकाने झाडली गोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 10:14 IST

कुत्र्याला दगड मारला म्हणून कुत्र्याच्या मालकाने गोळी झाडल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्लीच्या वेलकम परिसरातील जनता कॉलनीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

ठळक मुद्देकुत्र्याला दगड मारला म्हणून कुत्र्याच्या मालकाने गोळी झाडल्याचा प्रकार समोर आला आहे.दिल्लीच्या वेलकम परिसरातील जनता कॉलनीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. अफाक अली या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

नवी दिल्ली - पाळीव कुत्र्याला दगड मारणं एका व्यक्तीच्या जीवावर बेतलं आहे. कुत्र्याला दगड मारला म्हणून कुत्र्याच्या मालकाने गोळी झाडल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्लीच्या वेलकम परिसरातील जनता कॉलनीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत अफाक अली या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेहताब असे आरोपीचे नाव आहे. अफाक मेहताबच्या घराजवळून जात होता. त्याच दरम्यान मेहताबच्या पाळीव कुत्र्याने अफाकवर भुंकायला सुरुवात केली. तसेच कुत्र्याने त्याचा चावा घेण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी अफाकने रस्त्यावरचा एक दगड उचलून कुत्र्यावर भिरकावला. मेहताबने अफाकला दगड मारताना पाहिल्यावर त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात कुत्र्याच्या मालकाने त्याच्याजवळची बंदूक काढली आणि अफाकवर गोळया झाडल्या. गोळीबाराच्या घटनेनंतर मेहताब फरार झाला आहे. 

अफाकच्या सासऱ्यांनी पोलिसांना फोन करून त्यांच्या जावयावर कोणीतरी गोळीबार केला असल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी अफाकला मृत घोषित केले. पोलिसांनी याप्रकरणी कुत्र्याच्या मालकाविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. 

टॅग्स :delhiदिल्लीdogकुत्राPoliceपोलिसDeathमृत्यू