शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

Sukma Naxal Attack: 'निवडणूकजीवी मोदी-शहांना जवानांच्या जीवाची जरा तरी किंमत आहे का?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 17:02 IST

Sukma Naxal Attack: नक्षलवाद्यांनी कोब्रा कमांडोच्या जवानाला कोणतेही नुकसान करणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र, अद्यापही मोदी सरकारकडून या जवानाच्या सुटकेसाठी कुठलेही प्रयत्न करण्यात आले नाहीत

ठळक मुद्देनक्षलवाद्यांनी कोब्रा कमांडोच्या जवानाला कोणतेही नुकसान करणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र, अद्यापही मोदी सरकारकडून या जवानाच्या सुटकेसाठी कुठलेही प्रयत्न करण्यात आले नाहीत.

मुंबई - छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये 25 लाखांचा इनाम असलेल्य़ा नक्षलवाद्याला पकडण्यास गेलेल्या 200 सुरक्षा जवानांच्या एका तुकडीला घेरून नक्षलवाद्यांनी जोरदार हल्ला (Sukma Naxal Attack) केला. यामध्ये 24 जवान शहीद झाले असून एक जवान बेपत्ता झाला आहे. हा बेपत्ता जवान आपल्या ताब्यात असल्याचा फोन नक्षलवाद्यांनी (Naxalite) एका पत्रकाराला करून अट ठेवल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, या जवानाला सुखरुप परत आणण्यासाठी मोदी सरकार काहीच प्रयत्न करत नसल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसने केलाय. (Chhattisgarh: 24 jawans killed, 31 injured in anti-Naxals operation in Sukma. One missing Cobra commando in Naxal leader's Custody.)

नक्षलवाद्यांनी कोब्रा कमांडोच्या जवानाला कोणतेही नुकसान करणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र, अद्यापही मोदी सरकारकडून या जवानाच्या सुटकेसाठी कुठलेही प्रयत्न करण्यात आले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे केवळ निवडणुकांमध्ये व्यस्त असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.  नक्षल्यांनी ओलीस ठेवलेल्या कोब्रा कमांडो राकेश्र्वर सिंग मिनहास यांच्या सुटकेसाठी मोदी सरकार काहीच ठोस पावलं उचलताना दिसत नाहीये. सत्तेच्या लालसेपायी देशाचा कारभार वाऱ्यावर सोडून निवडणुकीच्या प्रचारात फिरणाऱ्या निवडणूकजिवी मोदी-शहांना जवानांच्या जिवाची जरा तरी किंमत आहे का?, असा प्रश्न काँग्रेसने ट्विट करुन विचारलाय. तसेच, मोदी आणि शहा हे निवडणुकांच्या प्रचार दौऱ्यातच व्यस्त असल्याचाही आरोप काँग्रेसने केलाय.  

नक्षलवाद्यांनी घात केलाकुख्यात नक्षलवादी हिडमा याला पकडण्यासाठी जवान रविवारी त्याच्या परिसरात गेले होते. 2000 जवानांची मोठी टीम वेगवेगळ्या भागात हिडमाला पकडण्यासाठी जंगलात घुसत होती. मात्र, नक्षलवाद्यांनी या जवानांना कोणत्याही प्रकारे न रोखता आतमध्ये जाऊ दिले आणि घात केला. सुरक्षा दलाच्या काही टीम तयार करण्यात आल्या होत्या. घनदाट जंगलात त्यांना कोपरान कोपरा शोधायचा होता. मात्र, नक्षलवादी त्यांची वाटच पाहत होते. अनेट तुकड्यांपैकी एका तुकडीला नक्षलवाद्यानी तीन बाजुंनी घेरले आणि हिडमाच्या बटालियनने हल्ला केला. यामध्ये हे जवान शहीद झाले. हिडमाची बटालियन डोंगररांगांतून फायरिंग करत होती. त्यामुळे खाली असलेले जवान सहज लक्ष्य ठरले. तिन्ही बाजुंनी घेरलेल्या जवानांनी त्याही परिस्थितीत हिडमाच्या मोक्याच्या जागी लपलेल्या आणि हल्ला करत असलेल्या नक्षलवाद्यांना चोख प्रत्यूत्तर दिले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपा