शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांची आता खैर नाही, लष्कराची मोहीम, सरकारही मोठ्या कारवाईच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 15:38 IST

Doda encounter : विधानसभा निवडणुकीपूर्वी जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचे बस्तान उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Doda encounter : आता जम्मू-काश्मीरमध्येदहशतवादाविरोधात अंतिम हल्ल्याची तयारी सुरू आहे. लष्कराबरोबरच सरकारही कारवाईत आहे. लष्करानं दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम उघडली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचे बस्तान उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, जम्मू काश्मीरमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. जम्मू काश्मीरच्या दोडा येथील पटनीटॉप जंगलात दहशतवाद्यांशी लढताना भारतीय सैन्याच्या कॅप्टनला वीरमरण प्राप्त झाले आहे. डोडा येथील उंच भागात बुधवारी सकाळपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. याबाबत माहिती देताना संरक्षण अधिकारी म्हणाले की, भारतीय लष्कराच्या ४८ राष्ट्रीय रायफल्सचे कॅप्टन दीपक हे शहीद झाले. तर जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला.

जवान आणि दहशतवादी यांच्यातील चकमकीत गोळी लागल्यानंतर कॅप्टन दीपक यांना त्यांच्या पथकाने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. पटनी टॉपमधील जंगलातील अकर क्षेत्रातील एका नदीकिनारी लपलेल्या दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला. बुधवारी सकाळी एन्काऊंटर करण्यात येत असलेल्या जागेवर आपली शस्त्र टाकून दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. घटनास्थळावरुन अमेरिका एम ४ रायफलही जप्त करण्यात आली असून तीन बॅगेतून स्फोटकेही जप्त करण्यात आली होती.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे. अनंतनाग, किश्तवाड आणि पटनी टॉपमध्ये दहशत माजवणाऱ्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराने संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. १५ ऑगस्टपूर्वीच लष्कराने दहशतवादी आणि त्यांच्या मदतनीसांना कायमस्वरूपी स्वातंत्र्य देण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे.

एकीकडे लष्कराने दहशतवाद्यांविरोधात मोर्चा उघडला आहे तर दुसरीकडे केंद्र सरकारनेही दहशतवाद्यांविरोधात मोठ्या कारवाईची तयारी केली आहे. संरक्षण मंत्रालयाने दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत स्वतः संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (NSA अजित डोवाल) यांच्यासह लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, संरक्षण सचिव आणि DGMO ही उपस्थित होते. त्यामुळे आता जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद संपवण्याची उलटी गिनती सुरू झाली आहे, हे स्पष्ट झाले आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्ला