स्वमूत्र करतं डेटॉलचं काम - लालूप्रसाद यादव

By Admin | Updated: February 1, 2016 17:37 IST2016-02-01T17:37:12+5:302016-02-01T17:37:12+5:30

एका कार्यक्रमात बोलताना लालूप्रसाद यादव यांनी स्वमूत्र हे डेटॉलचं काम करतं असं सांगत हशा मिळवला आहे.

Doctor's work turns out to be Lewprasad Yadav | स्वमूत्र करतं डेटॉलचं काम - लालूप्रसाद यादव

स्वमूत्र करतं डेटॉलचं काम - लालूप्रसाद यादव

>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. १ - राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव पुन्हा एकदा आपल्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना लालूप्रसाद यादव यांनी स्वमूत्र हे डेटॉलचं काम करतं असं सांगत हशा मिळवला आहे.
ते म्हणाले, की डेटॉल ही आधुनिक युगाची देण आहे. आमच्या लहानपणी कुठं डेटॉल होतं. त्यावेळी तर औषधं पण नसायची. शरीराच्या कुठल्याही भागाला जखम झाली की मूत्रविसर्जन करून टाकायचो, जे औषधाचं काम करायचं.
हल्लीच्या पिढीला काही माहिती नाही अशी पुस्ती जोडताना जखमा ब-या करण्याचा हा सगळ्यात सोपा उपाय असल्याचा सल्लाही त्यांनी दिलाय. जखमेवर मूत्रविसर्जन केलं की किटाणू राहत नाहीत असं त्यांनी म्हटलंय.

Web Title: Doctor's work turns out to be Lewprasad Yadav