शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

'डॉक्टरांनी महिन्यात फक्त 1 ऑपरेशन मोफत करावं, देशाचं चित्रच बदलेल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 14:16 IST

सोनून आत्तापर्यंत हजारो प्रवाशांना त्यांच्या स्वगृही पोहचवले असून कित्येकांना नोकरीही देण्याचं काम केलंय. लॉकडाऊन काळात सोनूने केलेल्या कामामुळे तो रॉबीनहूड बनला आहे.

ठळक मुद्देया कार्यक्रमात  मोहम्मद निझाम या वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याची स्टोरी सांगण्यात आली. त्यावेळी, देशातील डॉक्टरांनी महिन्यातून केवळ 1 ऑपरेशन मोफत करण्याची शपथ घेतली, तर देशाचं चित्र बदलले, असे सोनू सूदने म्हटलं.

मुंबई - अभिनेता सोनू सूदने गेल्या काही महिन्यांपासून हजारो प्रवाशांना घरी पोहोचवून त्यांची मदत केली आहे. लॉकडाऊन काळात मुंबईतून परराज्यात आपल्या गावी जाणाऱ्यांसाठी सोनू सूद हा सुपरहिरोच ठरला. या लोकांना मदत करण्याचं त्याचं काम अजूनही सुरूच आहे. त्यातच, आता प्रवाशी मजूरांना त्यांच्या गावात रोजगारही सोनूच मिळवून देणार आहे. प्रवासी मजूरांच्या मदतीपासून सुरू झालेलं त्याचं काम दिवसेंदिवस वाढतच आहे. सोनूकडून गरीब आणि गरजू रुग्णांच्या वैद्यकीय सर्जरीसाठीही मदत करण्यात येत आहे. सोनूने एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत अशाच रुग्णांच्या मदतीची स्टोरी दाखविण्यात आली आहे. 

सोनून आत्तापर्यंत हजारो प्रवाशांना त्यांच्या स्वगृही पोहचवले असून कित्येकांना नोकरीही देण्याचं काम केलंय. लॉकडाऊन काळात सोनूने केलेल्या कामामुळे तो रॉबीनहूड बनला आहे. नेटीझन्सनेही सोनूच्या कामाचं मोठं कौतुक करत त्याला व्हिलन रोल करणाऱ्या हिरोचा खिताब दिलाय. 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी एबीपी न्यूजवर सोनू सूदने लॉकडाऊन काळातील मदतीच्या घटनांची माहिती दिली. देशातील वैद्यकीय सेवांबद्दल बोलताना सोनूने आपलं मत व्यक्त केलं. 

या कार्यक्रमात  मोहम्मद निझाम या वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याची स्टोरी सांगण्यात आली. त्यावेळी, देशातील डॉक्टरांनी महिन्यातून केवळ 1 ऑपरेशन मोफत करण्याची शपथ घेतली, तर देशाचं चित्र बदलले, असे सोनू सूदने म्हटलं. मी, आपण किंवा इतर कुणीही नागरिकांनी ज्यांची परिस्थिती आहे त्यांनी, एक रुग्ण दत्तक घेतला, एका रुग्णाच्या मेडिसीनचा खर्च केला, सर्जरी मोफत केली तर अनेक समस्या दूर होतील, असे सोनूने म्हटले. मोहम्मद निझाम या विद्यार्थ्याने मेडिकलची परीक्षा दिली असून तो डॉक्टर बनला आहे. 

सोनू सूदच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोहम्मदने दररोज एका रुग्णाला मोफत उपचार देण्याची शपथ घेतली आहे. माझे पदवी पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर सेवेत रुजू होताच, मी हा उपक्रम हाती घेईल, असे मोहम्मदने म्हटले आहे. सोनू सूदने मोहम्मदचे हे ट्विट रिट्वीट करत प्रत्येक डॉक्टराने अशी शपथ घेतल्यास देशाचं चित्र बदलेल असं म्हटलंयं.  

टॅग्स :Sonu Soodसोनू सूदdoctorडॉक्टरTwitterट्विटरMumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या