शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

बलात्कार पीडितेची अवस्था पाहून डॉक्टरांचाही उडाला थरकाप; मध्य प्रदेशात निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 10:14 PM

सातत्याने होत असलेल्या बलात्काच्या घटनांमुळे देशभरात संतापाचे वातावरण असतानाच मध्य प्रदेशमधील मंदासौर येथे निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती घडली आहे.

मंदासौर - सातत्याने होत असलेल्या बलात्काच्या घटनांमुळे देशभरात संतापाचे वातावरण असतानाच मध्य प्रदेशमधील मंदासौर येथे निर्भया प्रकरणाची पुनरावृत्ती घडली आहे. येथे एका सात वर्षांच्या मुलीवर नराधमाने निर्भायाप्रमाणेच क्रूर बलात्कार केल्याचे समोर आले असून, पीडितेसी अवस्था पाहून डॉक्टरांचाही थरकाप उडाला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात संतापाचे वातावरण असून, आरोपींना फाशी देण्याची मागणी होत आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीस अटक केली असून, त्याला पाच दिवसांची कोठडी देण्यात आली आहे.  मध्य प्रदेशमधील मंदासौर येथे मंगळवारी 7 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीला मारहाण करून जखमी केले. तसेच तिच्या गुप्तागांवरही जखमा केल्या. अखेरीस तिचा गळा कापून हत्या करण्याचा प्रयत्न केला.   प्रसारमाध्यमांनी दिलेल्या  वृत्तानुसार,  पीडित मुलीवर करण्यात आलेले अत्याचार पाहून उपचार करणाऱ्या डॉक्टरांचाही थरकाप ऊडाला. रुग्णालयात दाखल करण्यात आलेली पीडिता सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. दरम्यान, या घटनेविरोधात मुस्लिम समाजाने मोर्चा काढला. तसेच आरोपीला बहिष्कृत करून त्याला फाशी देण्याची मागणी केली.  

टॅग्स :Rapeबलात्कारcrimeगुन्हे