शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

पत्नीची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी डॉक्टरनं दान केली ५ कोटींची संपत्ती; डोळ्यात पाणी आणणारी हृदयस्पर्शी कहाणी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 17:03 IST

हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात एका निवृत्त झालेल्या डॉक्टरनं आपल्या पत्नीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी आपली कोट्यवधींची संपत्ती सरकारच्या नावावर केली आहे.

हमीरपूर-

हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात एका निवृत्त झालेल्या डॉक्टरनं आपल्या पत्नीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी आपली कोट्यवधींची संपत्ती सरकारच्या नावावर केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या डॉक्टरांना कुणीही वारसदार नाही. त्यामुळे त्यांनी ५ कोटींहून अधिक किमतीची संपत्ती दान केली आहे. डॉक्टरांनी तयार केलेलं इच्छापत्र परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. 

नादौनच्या जोलसप्पड गावात सनकर येथील रहिवासी असलेले ७२ वर्षीय डॉक्टर राजेंद्र कंवर हे स्वास्थ्य विभाग आणि त्यांची पत्नी कृष्णा कंवर या शिक्षा विभागातून सेवानिवृत्त झाले होते. गेल्या वर्षी कृष्णा कंवर यांचं निधन झालं. दोघांना कुणीही वारस नसल्यानं आपली संपूर्ण संपत्ती आपल्या पश्चात सरकारला दान करायची असं दोघांनीही ठरवलं होतं. पत्नीच्या निधनानंतर आता तिची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर राजेंद्र कंवर यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत बैठक घेऊन आपली संपूर्ण संपत्ती सरकारला दान करत असल्याचं जाहीर केलं. 

पत्नीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी केलं दानआपली संपूर्ण संपत्ती दान करताना डॉ. राजेंद्र कंवर यांनी केलेलं विधान देखील त्यांच्याप्रतीचा सन्मान वाढेल असं आहे. "ज्या लोकांना घरात राहण्यासाठी जागा दिली जात नाही आणि वृद्धापकाळात ज्यांना उन्हातान्हात भटकावं लागतं अशांसाठी सरकारनं माझ्या संपत्तीतून मदतकार्य करावं. यासाठीची अट देखील इच्छापत्रात नमूद करण्यात आली आहे", असं राजेंद्र कंवर म्हणाले. 

बेघर वृद्धांच्या निवाऱ्याची सरकारनं सोय करावीवयोवृद्ध व्यक्तींसोबत सर्वांनी नेहमीच आदर आणि प्रेम भावना ठेवावी, असं आवाहन डॉ. राजेंद्र कंवर यांनी सर्वांना केलं आहे. त्यांनी स्वत:च्या घरासोबतच राष्ट्रीय महामार्गानजिकची पाच एकर जमीन आणि गाडी देखील सरकारला दान केली आहे. त्यांनी २३ जुलै २०२१ रोजीच संपूर्ण संपत्ती सरकारच्या नावे केली असून आता एकट्यानं उर्वरित आयुष्य जगणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

घरीच करायचे अनेक गरीब रुग्णांवर मोफत उपचार१९७४ साली एमबीबीएसपर्यंतचं शिक्षण डॉ. राजेंद्र कंवर यांनी इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केलं आहे. त्यानंतर प्रॅक्टीस पूर्ण केल्यानं ३ जानेवारी १९७७ साली त्यांनी भोरंज येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात चिकित्सक म्हणून नोकरी स्वीकारली. नोकरीच्या कार्यकाळात रुग्णांप्रती सेवाभावानं काम केल्यानं त्यांचा सन्मान देखील करण्यात आला आणि त्यांना पदोन्नती देण्यात आली होती. डॉ. कंवर सध्या जोलसप्पड येथे आपल्या राहत्या घरीच दररोज शेकडो गरीब रुग्णांवर मोफत उपचार करतात.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीSocial Viralसोशल व्हायरलHimachal Pradeshहिमाचल प्रदेश