शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

आधी पत्नी अन् दोन कोवळ्या मुलांचा खून, नंतर स्वत:लाही संपवलं; डॉक्टरच्या कृत्याने सर्वच हादरले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 10:09 IST

डॉक्टरचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर बेडमध्ये त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी मृतावस्थेत दिसून आली. 

रायबरेली : पत्नीसह दोन मुलांचा खून करून नंतर डॉक्टरने आत्महत्या करत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लालगंज येथील मॉडर्न रेल्वे कोच फॅक्टरी येथील सरकारी निवासस्थानी हा प्रकार घडला. दोन दिवसांपासून सदर कुटुंब राहात असलेली खोली बंद होती. त्यामुळे काल पोलिसांकडून दरवाजा तोडण्यात आला. त्यानंतर घरात चौघांचे मृतदेह आढळून आले.  अरुण सिंह (वय ४५ वर्ष) असं मृत डॉक्टरचं नाव असून मृतांमध्ये पत्नी अर्चना सिंह, मुलगी अदिवा (वय १२ वर्ष) आणि मुलगा आरव (वय ४ वर्ष) यांचा समावेश आहे.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, नेत्रतज्ज्ञ असलेले डॉ. अरुण सिंह हे मॉडर्न रेल्वे कोच फॅक्टरी परिसरातील रुग्णालयात डीएमए पदावर कार्यरत होते. ते आपल्या कुटुंबासह सरकारी निवासस्थानी वास्तव्यास होते. मात्र मागील दोन दिवसांपासून सिंह कुटुंबातील कोणीही घराबाहेर दिसत नव्हते. त्यामुळे आसपास राहणाऱ्या नागरिकांनी मंगळवारी याबाबत पोलिसांना फोनद्वारे माहिती दिली. त्यानंतर महिपाल पाठक आणि पंकज त्यागी हे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना सिंह कुटुंब राहात असलेल्या खोलीचा दरवाजा तोडला. त्यानंतर घरातील दृष्य पाहून सर्वांनाच धक्का बसला. कारण एका खोलीत डॉ. अरुण सिंह यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर बेडमध्ये त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी मृत अवस्थेत आढळली. 

डॉ. अरुण सिंह यांनी आधी पत्नी आणि मुलांचा खून करून नंतर स्वत:चं जीवन संपवलं असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. अरुण सिंह हे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होते, अशी माहिती त्यांच्या परिचयातील व्यक्तींनी दिली आहे. त्यामुळे तणावातूनच त्यांनी कुटुंबातील सदस्यांचा खून करून नंतर आत्महत्या केल्याचा संशय आहे.

दरम्यान, पोलिसांना चौघांचेही मृतदेह रुग्णालयात पाठवले असून  शवविच्छेदन अहवालातूनच त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशdoctorडॉक्टरDeathमृत्यू