शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी आणि प्रेयसीने मिळून केली लफडेबाज डॉक्टरची धुलाई   

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2018 12:42 IST

पत्नीला फसवून सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणशीसोबत दुसरा विवाह करण्याच्या प्रयत्नात असलेल्या डॉक्टरला रंगेलपणा चांगलाच महागात पडला आहे.

गाझियाबाद - पत्नीला फसवून सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणशीसोबत दुसरा विवाह करण्याच्या प्रयत्नात असलेल्या डॉक्टरला रंगेलपणा चांगलाच महागात पडला आहे. नवऱ्याच्या या इष्कबाजीची खबर लागलेल्या पत्नीने सर्व हकीकत त्या तरुणीस सांगितली. मग या तरुणीने नातेवाईकांसोबत मिळून लफडेबाज डॉक्टरची धुलाई केली. मिळालेल्या माहितीनुसार हा डॉक्टर मुंबईतील आहे. दीड वर्षांपूर्वी त्याचा विवाह मुंबईतच राहणाऱ्या आणि पेशाने सहाय्यक प्राध्यापक असलेल्या तरुणीसोबत झाला. विवाहानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे या तरुणीने नोकरी सोडली. त्यांना एक मुलगाही झाला. मात्र सहा महिन्यांपूर्वी पती-पत्नीमध्ये झालेल्या वादानंतर ही तरुणी माहेरी राहण्यास गेली. तर हा डॉक्टर तरुण गाझियाबादमधील एका खासगी रुग्णालयात नोकरीवर रुजू झाला.  यादरम्यान एकटा राहत असलेल्या डॉक्टराची दिल्लीत राहणाऱ्या तरुणीशी सोशल मीडियावरून मैत्री झाली. काही दिवसांतच त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. पण आपण आधीच विवाहित असल्याचे त्याने या तरुणीस सांगितले नाही. तसेच आपल्या कुटुंबीयांकडूनही विवाह निश्चित करून घेतला. दोन्ही कुटुंबांमध्ये ठरल्यानुसार ऑगस्टमध्ये साखरपुडा आणि ऑक्टोबर महिन्यात विवाहाचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. मात्र आपल्या पतीच्या या कारनाम्यांची माहिती पत्नीला लागली. तिने संबंधित तरुणीची भेट घेऊन तिला सत्य परिस्थिती कथन केली. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर या तरुणीने आपल्या नातेवाईकांसह त्या डॉक्टरचे घर गाठले आणि त्याची बेदम धुलाई केली.    

टॅग्स :FamilyपरिवारCrimeगुन्हाnewsबातम्या