तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 09:44 IST2025-09-02T09:39:41+5:302025-09-02T09:44:41+5:30
र्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कानडी भाषेवरुन सवाल विचारला.

तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
President Draupadi Murmu: देशभरात सध्या भाषा वादावरुन वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. दाक्षिणात्य राज्यांनी हिंदी सक्तीविरोधात आक्रमक भूमिका घेतली. केंद्र सरकार दाक्षिणात्य राज्यांवर हिंदी लादत असल्याचा आरोप करण्यात आला. यावरुन देशभरात गोंधळाचे वातावरण आहे. अशातच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कानडी भाषेवरुन सवाल विचारला होता. मात्र त्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचेच मन जिंकले आहे. मला कानडी भाषा येत नसली तरी मी ती शिकून घेईन असंही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं.
देशात सुरू असलेल्या भाषिक संघर्षादरम्यान, सोमवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यात मनोरंजक संवाद झाला. एका कार्यक्रमादरम्यान, म्हैसूरच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती मुर्मू यांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 'तुम्हाला कन्नड येते का?' असं विचारलं. राष्ट्रपती मुर्मू यांनी हसत हसत त्यांच्या प्रश्नाचे स्वागत केले आणि म्हणाल्या की नाही, मला कन्नड येत नाही. पण ही भाषा नक्कीच शिकेल.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हियरिंगच्या हीरक महोत्सवी समारंभात राष्ट्रपती मुर्मू पोहोचल्या होत्या. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कन्नड भाषेत स्वागत भाषण सुरू केले. त्यानंतर त्यांनी हसून राष्ट्रपतींकडे पाहिले आणि विचारले, "तुम्हाला कन्नड येते का?. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भाषणाला सुरुवात केली. भाषणाच्या शेवटी राष्ट्रपतींनी सिद्धरामय्या यांच्या प्रश्नाचे त्यांच्याच शैलीत उत्तर दिलं.
"मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छिते की कन्नड माझी मातृभाषा नसली तरी, मी माझ्या देशातील सर्व भाषा, संस्कृती आणि परंपरांचा मनापासून आदर करते. मला त्या प्रत्येकाबद्दल खूप आदर आणि कौतुक आहे. प्रत्येकाने आपली भाषा जिवंत ठेवावी, आपल्या परंपरा आणि संस्कृती जपावी आणि त्या दिशेने पुढे जावे अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि मी हळूहळू कन्नड शिकण्याचा प्रयत्न करेन," असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व लोकांनी कन्नड भाषा शिकावी असे म्हटले होते. वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक येथे स्थायिक झाले आहेत. आता जे आले आहेत त्यांनीही कन्नड भाषा शिकावी, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता थेट कन्नड भाषेवरुन मुख्यमंत्री आणि राष्ट्रपती मुर्मू यांच्यात संवाद झाला.