तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 14:49 IST2025-12-18T14:49:19+5:302025-12-18T14:49:59+5:30

प्रवाशांना डब्यांमध्ये वैयक्तिक सामान म्हणून १०० सेमी x ६० सेमी x २५ सेमी (लांबी x रुंदी x उंची) पर्यंतच्या ट्रंक, सुटकेस आणि बॉक्स नेण्याची परवानगी आहे.

Do you have more than 40 kg of luggage in your bag?; Know the new rule before traveling by train | तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम

तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम

नवी दिल्ली - विमान वाहतूक करण्यापूर्वी तुम्ही नेत असलेल्या साहित्याचे वजन तपासले जाते. मर्यादेपक्षा जास्त वजन असल्यास त्यावर वाढीव शुल्क आकारले जाते. परंतु आता ट्रेनने प्रवास करतानाही ही काळजी घ्यावी लागणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत उत्तर देताना ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मर्यादित वजनापेक्षा अधिकचे साहित्य नेल्यास त्याचे शुल्क भरावे लागेल असं म्हटलं आहे. खासदार वेमिरेड्डी प्रभाकर रेड्डी यांच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले. ज्यात विमान प्रवासासारखे रेल्वे प्रवास करतानाही प्रवाशांसाठी बॅगच्या वजनाचा नियम लागू केलाय का असं विचारण्यात आले होते.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, सध्या विविध श्रेणीनुसार प्रवाशांकडून ट्रेनमधून घेऊन जाणाऱ्या साहित्यावर कमाल वजन निश्चित केले आहे. प्रत्येक श्रेणीत मोफत सामान आणि कमाल मर्यादा ठरवण्यात आली आहे. सेकंड क्लासमधून प्रवास करणाऱ्यांसाठी ३५ किलोपर्यंत सामान मोफत नेता येईल. त्यानंतर ७० किलोपर्यंत सामानावर शुल्क आकारले जातील. स्लीपर क्लासच्या प्रवाशांसाठी ४० किलो मोफत सामान नेण्याची परवानगी आहे. त्यावर ८० किलोपर्यंत सामानावर शुल्क आकारले जाईल. 

एसी थ्री टियर आणि चेअर कारच्या प्रवाशांसाठी ४० किलोपर्यंत सामान मोफत नेण्याची परवानगी आहे. फर्स्ट क्लास आणि एसी टू टियरमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ५० किलोपर्यंत सामान नेता येईल. त्यांना १०० किलोपर्यंत सामान नेण्याची परवानगी आहे. अतिरिक्त सामानावर शुल्क आकारले जातील. कमाल मर्यादेत मोफत सामानाच्या मर्यादेचाही समावेश आहे. मोफत मर्यादेपेक्षा अधिकचे सामना कोचमधून घेऊन जात असाल तर त्यासाठी निर्धारित दरापेक्षा दीड पट जास्त शुल्क भरावे लागेल असेही रेल्वे मंत्र्‍यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, प्रवाशांना डब्यांमध्ये वैयक्तिक सामान म्हणून १०० सेमी x ६० सेमी x २५ सेमी (लांबी x रुंदी x उंची) पर्यंतच्या ट्रंक, सुटकेस आणि बॉक्स नेण्याची परवानगी आहे. यापैकी कोणत्याही आकारापेक्षा जास्त सामान कोचमध्ये ठेवण्याची परवानगी नाही आणि अशा सामानांसाठी ब्रेक व्हॅन किंवा पार्सल व्हॅनमध्ये बुक करावे लागतील असंही रेल्वे मंत्री वैष्णव यांनी सांगितले आहे.

Web Title : ट्रेनों में 40 किलो से अधिक सामान? नए नियम जानें!

Web Summary : ट्रेनों में सामान सीमा से अधिक होने पर शुल्क लगेगा, रेल मंत्री वैष्णव ने घोषणा की। सीमाएँ श्रेणी के अनुसार भिन्न हैं: सेकंड क्लास में 35 किलो, स्लीपर में 40 किलो और फर्स्ट/एसी टू-टियर में 50 किलो मुफ्त है। अतिरिक्त सामान पर मानक दर से 1.5 गुना शुल्क लगेगा। व्यक्तिगत सामान का आकार भी सीमित है।

Web Title : Exceeding 40kg baggage on trains? Know the new rules!

Web Summary : Passengers exceeding baggage limits on trains will face charges, Railways Minister Vaishnaw announced. Limits vary by class: Second class allows 35kg free, Sleeper 40kg, and First/AC Two-Tier 50kg. Excess luggage incurs 1.5 times the standard rate. Dimensions of personal luggage are also restricted.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.