शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

पाच राज्यांतील निवडणुका खरेच सुप्त संकेत देतात का? लोकसभा निवडणुकीचा अंदाज लावणे होते अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 08:16 IST

विशेषतः हिंदी पट्ट्यातील राज्यांच्या निकालांवरून ६ महिन्यांनंतर लोकसभेवेळी काय घडणार, याचा अंदाज लावणे अशक्य असल्याचा आजवरचा अनुभव आहे. 

सुनील चावके -नवी दिल्ली :  गेल्या २५ वर्षांपासून लोकसभा निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वी होणाऱ्या  विधानसभा निवडणुकांच्या उपांत्य फेरीचा कौल लोकसभा निवडणुकीत काय घडणार, याचे फसवे संकेत देत आला आहे. विशेषतः हिंदी पट्ट्यातील राज्यांच्या निकालांवरून ६ महिन्यांनंतर लोकसभेवेळी काय घडणार, याचा अंदाज लावणे अशक्य असल्याचा आजवरचा अनुभव आहे. सोनिया गांधी यांच्या पदार्पणात १९९८ मध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्लीत काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडविला होता. विजयामुळे उत्साही काँग्रेसने अविश्वास प्रस्ताव आणून अवघ्या एका मताच्या फरकाने वाजपेयी सरकार पाडले. त्यानंतर सोनिया गांधींनी सरकार स्थापनेविषयी दावा केला, पण काँग्रेसचे सत्तेत परतण्याचे मनसुबे हिंदी पट्ट्यातील नेत्यांनी धुळीस मिळविले.   '

भाजपलाही तोच अनुभव२००३ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने दिल्ली वगळता मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये मोठ्या फरकाने काँग्रेसला पराभूत केले. पुढे भाजपने २००४ साली सहा महिने आधी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्याचे ठरविले, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

काँग्रेस पुन्हा सत्तेत२००८ साली भाजपने मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ राखले, पण काँग्रेसने राजस्थान आणि दिल्लीत विजय मिळवून लढत २-२ अशी बरोबरीत राखली. पण सहा महिन्यांनंतर यूपीएने २००४ पेक्षा मोठा विजय मिळवत पुन्हा सत्तेवर बसला. 

मोदींच्या लाटेत काँग्रेसचा पराभव२०१३ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर भाजपने मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान जिंकली आणि राष्ट्रीय राजकारणातील काँग्रेसच्या पतनाची सुरुवात केली. त्यातूनच २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला.

 

टॅग्स :Electionनिवडणूकlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी