शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

पद्मावत एक 'मनहूस' चित्रपट, वेळ आणि पैसा वाया घालवू नका - असदुद्दीन ओवेसी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 1:59 PM

पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दाखवला असला तरी विविध संघटना आणि नेत्यांकडून या चित्रपटाला असणारा विरोध कायम आहे.

ठळक मुद्देपद्मावत एक बकवास, मनहूस चित्रपट आहे त्यामुळे हा चित्रपट पाहण्यात वेळ घालवू नका असे असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांना आवाहन केले आहे. राजपूत राणी पद्मावती आणि अलाउद्दीन खिलजी यांच्यातील संघर्षावर या चित्रपटाची कथा आधारलेली आहे.

नवी दिल्ली - पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दाखवला असला तरी विविध संघटना आणि नेत्यांकडून या चित्रपटाला असणारा विरोध कायम आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या मार्गातील अडचणी अद्यापी दूर झालेल्या नाहीत. आता एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पद्मावत चित्रपटाच्या विरोधात मतप्रदर्शन केले आहे. 

पद्मावत एक बकवास, मनहूस चित्रपट आहे त्यामुळे हा चित्रपट पाहण्यात वेळ घालवू नका असे असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांना आवाहन केले आहे. राजपूत राणी पद्मावती आणि अलाउद्दीन खिलजी यांच्यातील संघर्षावर या चित्रपटाची कथा आधारलेली आहे. बुधवारी रात्री वारंगल शहरात जाहीरसभेला संबोधित करताना ओवेसी यांनी हे विधान केले. खासकरुन त्यांनी मुस्लिम तरुणाईला पद्मावत चित्रपट न पाहण्याचे आवाहन केले. हा चित्रपट पाहून तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा वाया घालवू नका असे ते म्हणाले. 

सर्वोच्च न्यायालायाचा निकालकालच सुप्रीम कोर्टानं पद्मावत सिनेमाच्या बाजूनं निर्णय दिल्यानं सिनेनिर्मात्यांना दिलासा मिळाला.  चार राज्यांमध्ये पद्मावत सिनेमाच्या प्रदर्शनावर लावण्यात आलेल्या बंदीला कोर्टानं स्थगिती दिली. पद्मावत सिनेमा प्रदर्शित करण्यास विविध राज्यांतील सरकारने घातलेल्या बंदीविरोधात निर्मात्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. तब्बल चार राज्यांनी पद्मावत सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. 25 जानेवारीला पद्मावत सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे.  

दरम्यान, या चार राज्यांकडून पद्मावत सिनेमावर लावण्यात आलेली बंदी घटनाबाह्य असल्याचंही कोर्टानं सांगितले. वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनी निर्मात्यांची बाजू कोर्टासमोर मांडली. साळवे यांनी सांगितले की, सेन्सॉर बोर्डकडून संपूर्ण देशाला सिनेमा प्रदर्शित करण्यासंबंधीचे प्रमाणपत्र मिळाले आहे. अशात काही राज्यांनी सिनेमावर लावलेली बंदी ही घटनाबाह्य आहे. ही बंदी हटवण्यात यावी, अशी विनंती करत साळवेंनी निर्मात्यांची बाजू कोर्टासमोर मांडली.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीPadmavatपद्मावत