बाहेर काहीच बोलू नका.!

By Admin | Updated: August 6, 2014 02:52 IST2014-08-06T02:52:59+5:302014-08-06T02:52:59+5:30

पक्षातील एकही गोष्ट बाहेर कळता कामा नये, आज मी जे काय सांगतो आहे, तेही कोणीच बाहेर बोलू नये, असा सज्जड दम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र व गोव्यातील खासदारांना दिला.

Do not talk outside! | बाहेर काहीच बोलू नका.!

बाहेर काहीच बोलू नका.!

रघुनाथ पांडे  - नवी दिल्ली
पक्षातील एकही गोष्ट बाहेर कळता कामा नये, आज मी जे काय सांगतो आहे, तेही कोणीच बाहेर बोलू नये, असा सज्जड दम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र व गोव्यातील खासदारांना दिल्याने तासाभराच्या मोदीभेटीनंतर, ‘ते आले, त्यांनी हस्तांदोलन केले, कसे आहात विचारले आणि मग आम्ही चहापान घेतले.’ या कथेव्यतिरिक्त एकही वाक्य खासदार काढायला तयार नाहीत.
विशेष म्हणजे, खासदार आनंद झाला का, की गुरुमंत्र दिले तेसुद्धा सांगायला राजी नव्हते. तासाभराच्या भेटीत 2क् मिनिटे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले; तर 4क् मिनिटे चहापान व परिचय झाला. 
सत्ता येण्याआधी आपण काय करतो आहोत, केले आहे. करणार आहोत असे गळ्यात जोर आणून सांगणारे भाजपाचे खासदार सत्तेत येताच चिडीचूप झाल्याचे धक्कादायक चित्र राजधानीत बघायला मिळत आहे. आधीच भाषिक मर्यादा व उत्तरेतील प्रभावामुळे मराठी खासदारांची दिल्लीत मुस्कटदाबी होते, पण प्रथमच पंतप्रधानांनी आमंत्रित केल्यावर त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली, तो अनुभवही सांगण्यास एकही खासदार आजतरी राजी नाही.
महाराष्ट्रातील निवडणुकीच्या पुढय़ात मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील भाजपाच्या लोकसभा व राज्यसभेतील खासदारांनी भेटीसाठी आमंत्रित केले. तीन दिवसांपूर्वी निमंत्रणो देण्यात आली होती. संसदेत दिवसभर थांबलेल्या नव्या खासदारांना आपण पंतप्रधानांना भेटणार याचे कमालीचे अप्रूप होते. 
सायंकाळ झाली, सा:यांची पावले पंतप्रधानांच्या 7, रेसकोर्स या निवासस्थाने वळली. सायंकाळी साडेसहानंतर तासभर हे सारे खासदार तिथे होते. राज्याशी संबंधित केंद्रातील मंत्री, लोकसभा व राज्यसभेतील खासदारांची संख्या पूर्ण होती, असे सांगितले गेले.. पण जेव्हा तेथून परतले तेव्हा काही ज्येष्ठ खासदारांनी एकेका खासदारांना जवळ बोलावून माध्यमांना काहीच सांगू का, कुणी खोदून विचारलेच  किंवा परिचयातीलच पत्रकार असेल तर सांगा मोदी साहेबांचे चहापान होते, दुसरे काहीच नाही. झालेही तसेच, बहुतेक खासदारांनी मोबाइल स्वीच ऑफ ठेवले, काही जण तर बाथरूममध्ये होते. काही जण भोजनात व्यस्त होते. काहींशी संपर्क झाला तेव्हा ते म्हणाले, ‘छान झाली भेट, मोदीसाहेब हसतमुख होते.’ 
सूत्रंनी सांगितले की, पंतप्रधान आक्रमक होते. पण हसतहसत ते प्रत्येक खासदाराचा परिचय करून घेत होते. त्यांनी खासदारांच्या 
कामाबद्दल माहिती घेतली, कसे काम केले पाहिजे ते सांगून, कोणत्या मंत्र्यांबाबत काही तक्रार आहे का, असे विचारले, महाराष्ट्रातील निवडणूक जिंकलीच पाहिजे, त्यासाठी 
रूपरेषा निश्चित करा, असे सांगून खासदारांकडे निवडणुकीत असलेली जबाबदारी त्यांनी सांगितली. ती 
त्यांनी कशी पार पाडायची, त्याचे अहवाल दैनंदिन स्वरूपात कोणाला द्यायचे ते ठरविले जाईल, असे सांगितले. राज्यातील 
राजकीय परिस्थिती आपल्याला कशी अनुकूल करून घेता येईल यावर बोलले. काही बदल झालेच तर ते पक्ष हितासाठीच असतील, असे सांगण्यासही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. मात्र ते कोणते बदल असतील ते रहस्य कायम ठेवले.
 
मोदी उवाच़़़्
विधानसभा निवडणूक उमेदवारीसाठी शिफारस करू नका़ नातेवाइकांना तिकीट दिले जाणार नाही़ लोकांमध्ये जाऊन काम करा़ निवडणुकीचा सव्र्हे पूर्ण झाला असून, महाराष्ट्रात सरकार आपलं येणार आह़े पुन्हा निवडणूक लढवायची असेल तर प्रसार माध्यमांसमोर जाऊ नका़ एका खासदाराच्या पत्नीनं टोमॅटो महाग झाल्याचं सगळ्यांसमोर वक्तव्य केलं होतं, हे कितपत योग्य आहे, याचा विचार करा़ 

 

Web Title: Do not talk outside!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.