शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियातून घाणेरड्या गोष्टी पसरवू नका, मोदींचे सव्वासौ करोड देशवासियांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 06:34 IST

पंतप्रधान म्हणाले... खोटीनाटी माहिती, संदेश पाठविणे हे समाजासाठी घातक; हा मुद्दा एखादा राजकीय पक्ष किंवा विचारसरणीपुरताच मर्यादित नाही

नवी दिल्ली : लोकांनी समाजमाध्यमांद्वारे घाणेरड्या गोष्टी पसरवू नयेत, ते सभ्य समाजाचे लक्षण नाही, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. वाराणसीतील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना मोदी म्हणाले की, समाजमाध्यमांचा वापर आजूबाजूच्या अनेक चांगल्या गोष्टी इतरांना समजण्यासाठी केला जावा. खोटीनाटी माहिती, संदेश पाठविणे हे समाजासाठी घातक आहे.

संदेश किंवा व्हिडीओ यातील माहिती कितपत खरी आहे याची शहानिशा न करता ती इतरांना पाठविली जाते.समाजमाध्यमांचा व्यवस्थित वापर करण्याचा मुद्दा हा एखादा राजकीय पक्ष किंवा विचारसरणीपुरताच मर्यादित नाही. त्याचा संबंध देशातील १२५ कोटी जनतेशी आहे. समाज माध्यमांतील संदेशांमध्ये अनेकदा अभिरुचीहीन शब्दांचा वापर केलेला असतो. महिलांविषयी अत्यंत असभ्य भाषेत लिहिलेले असते. असे संदेश व्हायरल होऊ नयेत.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

गल्लीतले भांडणही बनते राष्ट्रीय बातमीमोदी म्हणाले की, सध्या एखाद्या गल्लीत दोन कुटुंबांमध्ये झालेले भांडणही राष्ट्रीय स्तरावरची बातमी बनते. ती तशा पद्धतीने प्रसारित केली जाते. समाजमाध्यमांचा वापर दुसऱ्यांवर राळ उडविण्यासाठी करू नये, ही सवय प्रत्येकाने लावून घ्यायला हवी.देशाविषयी सकारात्मक दृष्टिकोन तयार होईल, अशा पद्धतीच्या बातम्यांचा प्रसार वाढायला हवा. देशाचा चेहरामोहरा बदलत असून प्रगतीही झपाट्याने होत आहे. हे खरे चित्र दाखविणारे व्हिडीओ समाजमाध्यमांतून मोठ्या प्रमाणावर पाठवा.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSocial Mediaसोशल मीडियाViral Photosव्हायरल फोटोज्