शहरं
Join us  
Trending Stories
1
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
2
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
3
डोंबिवली एमआयडीसीत भीषण स्फोट; केमिकल कंपनीत बॉयलर फुटल्याने लागली आग
4
थरारक! ५ मिनिटांत ६००० फूट विमान खाली आलं; साक्षात मृत्यू डोळ्यासमोर उभा राहिला
5
अबब! ही तर फक्त सुरुवात...पारा आणखी 3 ते 4 अंशांनी वाढणार, IMDचा इशारा
6
बापरे एवढी बेरोजगारी! IIT च्या ७००० विद्यार्थ्यांना नोकरी मिळेना; मुंबई, दिल्लीचे माजी विद्यार्थांना साकडे
7
फ्लाइटला ८ तास उशीर, क्रू नसल्याने विमानच उडालं नाही! अक्षया नाईक संतापली, म्हणाली- "लहान मुलं, वयोवृद्ध माणसं..."
8
'या' ३१ जागांवर 'अबकी बार ४०० पार'चं भवितव्य; UP मध्ये भाजपाचा खेळ बिघडणार?
9
Video: पती घरी येताच पत्नीने लाथाबुक्क्यांनी सुरु केली मारहाण, सीसीटीव्ही फुटेज होतेय व्हायरल
10
“स्वयंघोषित गांधी २०१४ नंतर गायब, खरे गांधीवादी असते तर...”; रोहित पवारांची अण्णा हजारेंवर टीका
11
"संविधान धर्माच्या नावावर आरक्षण देत नाही, मुस्लिम आरक्षण संपवणार", अमित शाह स्पष्टच बोलले
12
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
13
Rajnath Singh : चांदीचा मुकुट घालताच राजनाथ सिंह म्हणाले, "हा विकून गरिबाच्या मुलीसाठी पैंजण बनवा"
14
हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ? पत्नी नताशासोबत दुरावा, अभिनेत्रीने केलं असं काही.... 
15
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
16
"RCB तून बाहेर पड आणि दिल्लीकडून खेळ मग...", दिग्गजाचा Virat Kohli ला सल्ला!
17
बांग्लादेशी खासदाराची कोलकात्यात निर्घृण हत्या; जवळच्या मित्रानेच दिली 5 कोटींची सुपारी
18
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
19
CSK ला हरवलं म्हणजे IPL ट्रॉफी जिंकली, असं होत नाही; माजी खेळाडूचा RCB ला टोमणा
20
'श्रीवल्ली' येतेय सर्वांना तिच्या तालावर नाचवायला, 'पुष्पा 2' मधील रश्मिकाच्या गाण्याची झलक बघाच

‘मी याचना करतो’ असे म्हणू नका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 3:49 AM

नवी दिल्ली : सरकारी दस्तऐवज सभागृहात मांडताना मंत्र्यांनी ‘हे दस्तऐवज सादर करू देण्याची मी याचना करतो’, अशी भाषा वापरू नये याचे राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा स्मरण दिले.

नवी दिल्ली : सरकारी दस्तऐवज सभागृहात मांडताना मंत्र्यांनी ‘हे दस्तऐवज सादर करू देण्याची मी याचना करतो’, अशी भाषा वापरू नये याचे राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा स्मरण दिले.सभागृहात सरकारी दस्तऐवज मांडताना ‘आजच्या कार्यसूचीत माझ्या नावे दाखविलेले दस्तऐवज सभागृहात मांडू देण्याची मी याचना करतो’, अशी भाषा वापरण्याची प्रथा रूढ आहे. परंतु १५ डिसेंबर रोजी नायडू यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी साम्राज्यवादी गुलामगिरीची भाषा सोडून देण्याची सूचना केली होती. त्याऐवजी मंत्र्यांनी, ‘मी हे दस्तऐवज सभागृहात मांडण्यासाठी उभा आहे,’ असे म्हणावे असे त्यांनी सुचविले होते.शुक्रवारी विधि राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी सभागृहात दस्तऐवज मांडताना ‘याचना करतो’, असे म्हटले तेव्हा सभापती नायडू यांनी आपण आधी केलेल्या सूचनेची आठवण करून दिली. कदाचित मी याआधी ही सूचना केली तेव्हा मंत्री चौधरी हजर नसावेत, असे म्हणून नायडू यांनी त्यांना ‘कृपया याचना करतो, असे म्हणू नका’, असे सांगितले. नुसते उभे राहून, मी हे दस्तऐवज सभापटलावर मांडत आहे, असे म्हटले तरी पुरेसे आहे. ‘याचना’ शब्द वापरण्याचे टाळले तर चांगले, असे ते म्हणाले.बसल्या जागेवरून न बोलण्याचीही सभापतींनी सदस्यांना समज दिली व एखाद्या हेडमास्तरच्या शिस्तीने त्यांनी सदस्यांनी विषय सोडून अवांतर बोलू नये, असेही सांगितले.>कटुतेला पूर्णविरामनायडू यांनीकालच्या कामकाजातीलएका प्रसंगाचाउल्लेख केला. काँग्रेसचे बी. के. हरिप्रसाद यांनी काही टिप्पणी केली होती. नायडू म्हणाले की, संबंधित सदस्य आज सकाळी मला भेटले व आपल्याला सभापतींविषयी नितांत आदर आहे व ते शब्द भावनेच्या भरात आपल्या तोंडातून निघून गेले, असे त्यांनी सांगितल्यावर आपण त्या प्रकरणाला पूर्णविराम देण्याचे ठरविले आहे.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडू