न घाबरता काम करा - मोदींचे सरकारी अधिका-यांना आश्वासन

By Admin | Updated: June 5, 2014 11:30 IST2014-06-05T11:28:12+5:302014-06-05T11:30:19+5:30

सरकारी अधिका-यांनी निर्णय घेताना घाबरु नये. तुमच्या प्रत्येक निर्णयासाठी मी तुमच्यासोबत उभा राहिन असे आश्वासन नरेंद्र मोदींनी सरकारी अधिका-यांना दिले आहे.

Do not panic - Assure to Modi's government officials | न घाबरता काम करा - मोदींचे सरकारी अधिका-यांना आश्वासन

न घाबरता काम करा - मोदींचे सरकारी अधिका-यांना आश्वासन

>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ५ - सरकारी कामकाजाला गती देण्यावर भर देतानाच सरकारी अधिका-यांनी निर्धास्तपणे पण नियमात राहून काम करावे. निर्णय घेताना घाबरु नये. तुमच्या प्रत्येक निर्णयासाठी मी तुमच्यासोबत उभा राहिन असे आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकारी अधिका-यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 
बुधवारी सर्व मंत्रालय व विभागातील ७७ सचिव आणि अन्य वरिष्ठ अदिका-यांसोबत एक बैठक घेतली. सुमारे तीन तास ही बैठक सुरु होती. या बैठकीत नरेंद्र मोदी म्हणाले,  प्रशासकीय नियम व प्रक्रिया आणखी सोपी करुन त्यात सुधारणा करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. यामुळे लोकांचा फायदा होईल. तसेच जे नियम व प्रक्रिया जुनी झाली आहे त्यात सुधारणा करण्यासाठी अधिका-यांनी त्यांचे मत माझ्याकडे मांडावे असे मोदींनी स्पष्ट केले. मी फोन व ईमेलच्या माध्यमातून सदैव तुम्हाला उपलब्ध आहे असेही मोदींनी नमूद केले.  अधिका-यांच्या प्रत्येक निर्णयात त्यांच्यासोबत उभा राहण्याचे आश्वासन देत त्यांनी अधिका-यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्नही केला. गेल्य आठ वर्षात पंतप्रधानांनी सर्व सरकारी अधिका-यांशी प्रदीर्घ चर्चा केल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जाते.

Web Title: Do not panic - Assure to Modi's government officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.