शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

वादग्रस्त वक्तव्ये करू नका, नरेंद्र मोदींच्या भाजपा नेत्यांना कानपिचक्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2018 21:37 IST

मंत्री, नेते आणि कार्यकर्त्यांकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार वारंवार अडचणीत सापडत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपाच्या लहान मोठ्या नेत्यांची हजेरी घेतली

नवी दिल्ली - मंत्री, नेते आणि कार्यकर्त्यांकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार वारंवार अडचणीत सापडत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपाच्या लहान मोठ्या नेत्यांची हजेरी घेतली असून, वादग्रस्त वक्तव्ये करू नका, प्रसारमाध्यमांशी बोलताना संयम बाळगा, अशी सूचना त्यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नरेंद्र मोदी अॅपच्या माध्यमातून भाजपा खासदार आणि आमदारांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी पक्षाच्या नेत्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. मोदी म्हणाले, " आम्ही चुका करतो आणि प्रसारमाध्यमांच्या हाती आयते कोलीत देतो. जेव्हा कॅमेरा पाहतो तेव्हा आम्ही प्रत्येक विषयातील तज्ज्ञ असल्याच्या थाटात वक्तव्य करण्यासाठी उतावीळ होतो. मग प्रसारमाध्यमे अशा वक्तव्यांचा वापर करून घेतात. ही प्रसारमाध्यमांची चूक म्हणता येणार नाही. 

 

यावेळी मोदींनी सोशल मीडियावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला  नेत्यांना दिला.  तसेच खासदारांचे त्यांच्या चांगल्या कामासाठी कौतुक केले. तसेच जनधन योजना, कौशल विकास योजना, मुद्रा योजना यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. पंतप्रधानांनी खासदार आणि आमदारांसोबत ग्रामविकास आणि शेतकऱ्यांच्या हितांसदर्भात चर्चा केली. तसेच पंचायत स्तरावर विकासकार्यांसंदर्भात चर्चा केली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारणSocial Mediaसोशल मीडियाMediaमाध्यमे