शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विरोधकांच्या ड्रायव्हरकडे शिकाऊ लायसन्सही नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 05:54 IST

या विरोधी आघाडीच्या ड्रायव्हरकडे शिकाऊ लायसन्सही नाही. त्यामुळे ते ही गाडी खड्ड्यातही घालू शकतात!

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला तगडे आव्हान उभे करण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी बांधण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी करीत असलेल्या प्रयत्नांची टर उडवत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी रविवारी म्हणाले की, या विरोधी आघाडीच्या ड्रायव्हरकडे शिकाऊ लायसन्सही नाही. त्यामुळे ते ही गाडी खड्ड्यातही घालू शकतात!‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नक्वी म्हणाले की, विरोधी पक्षांतील ज्येष्ठ नेतेही नाइलाज आहे म्हणून राहुल गांधींना पाठिंबा देत आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्ला यात विशेष रस घेत आहेत; पण आपण ज्यांच्या हाती गाडीचे स्टिअरिंग ड्रायव्हर म्हणून देत आहोत त्यांच्याकडे साधे शिकाऊ लायसन्सही नाही. तेव्हा ही गाडी ते खड्ड्यात तर घालणार नाहीत ना, याचा विचार या ज्येष्ठ नेत्यांनी करायला हवा. नक्वी असेही म्हणाले की, ‘इतने खिलाड़ी एक अनाड़ी के पिछे चल रहे है, तो हम क्या कर सकते है! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात जमीन अस्मानाचे अंतर आहे व दोघांची तुलना होऊच शकत नाही, असे सांगत अल्पसंख्य व्यवहारमंत्री म्हणाले की, एकीकडे चार दिवस काम केल्यावर चार महिने सहलीला जाणारे राहुल गांधी आहेत, तर दुसरीकडे, गेल्या चार वर्षांत साडेचार तासांचीही सुटी न घेतलेले मोदी आहेत.आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि ‘रालोआ’ची कामगिरी सन २०१४ च्या तोडीची असेल, असा विश्वास व्यक्त करीत नक्वी म्हणाले की, गेल्यावेळी आम्ही मोदीजींच्या ‘नावा’वर निवडणूक जिंकली होती. यावेळी आम्ही त्यांच्या ‘कामा’वर जिंकू! उन्मादी जमावांकडून होणाऱ्या हत्यांमुळे अल्पसंख्य समाजाच्या मनात असुरक्षित भावना आहे, याचाही त्यांनी इन्कार केला. ते म्हणाले की, अशा घटनांकडे सांप्रदायिक नजरेने नव्हे, तर कायदा आणि सुव्यवस्थेता प्रश्न म्हणून पाहावयास हवे. राज्यांनीही याचदृष्टीने कारवाई करायला हवी. जातीय दंगली बंद झाल्याने आणि निरपराध अल्पसंख्य व्यक्तींना खोट्यानाट्या प्रकरणात अडकविणेही थांबल्याने देशातील अल्पसंख्य समाज पूर्णपणे आश्वस्त असून, पूर्ण स्वातंत्र्य उपभोगत आहे.

टॅग्स :BJPभाजपा