कोणाच्याही पाया पडू नका, मेहनत करा- मोदींची खासदारांना सूचना
By Admin | Updated: June 6, 2014 16:38 IST2014-06-06T15:38:43+5:302014-06-06T16:38:42+5:30
नेत्यांच्या पाया पडण्यात वेळ न घालवाता, आपल्याला ज्या लोकानी निवडून दिले आहे, त्या सर्व तळागाळातील लोकांशी संपर्कात रहा, व कठोर मेहनत करून कामाचा दर्जा वाढवा, अशी ताकीद पंतप्राधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना दिली.

कोणाच्याही पाया पडू नका, मेहनत करा- मोदींची खासदारांना सूचना
>
ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ६ - नेत्यांच्या पाया पडण्यात वेळ न घालवाता, आपल्याला ज्या लोकानी निवडून दिले आहे, त्या सर्व तळागाळातील लोकांशी संपर्कात रहा, व कठोर मेहनत करून कामाचा दर्जा वाढवा, अशी ताकीद पंतप्राधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांना दिली. संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये २0 मिनिटे केलेल्या भाषणात त्यांनी नवनिर्वाचित खासदारांना कठोर मेहनत घेऊन कामे पूर्ण करण्याचा, तळागाळातील जनतेच्याही संपर्कात राहण्याचा सल्लाही दिला.
भाजापा आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत नसून सत्तेवर आली आहे. सरकारचे ध्येय-धोरण आणि योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहाचविण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर असल्याचेही मोदी म्हणाले.
मोदींची भेट घेतल्यानंतर अनेक खासदार त्यांच्या पाया पडले होते. त्या पार्श्वभूमीवर चमचेगिरीच्या वागणुकीवर प्रहार करत खासदारांनी आपल्या तसेच इतर नेत्यांच्या पाया पडू नये व कामावर लक्ष द्यावे, असेदेखील मोदींनी खासदारांना खडसावल्याचे सुत्रांनी सांगितले.