दीपावली उत्सव युनेस्कोच्या वारसा यादीत; भारतासाठी अभिमानाची घटना; पंतप्रधान मोदींनी केले निर्णयाचे स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 05:46 IST2025-12-11T05:43:05+5:302025-12-11T05:46:37+5:30
भारतातील १६व्या गोष्टीचा युनेस्कोच्या यादीत समावेश झाला आहे. याआधी कुंभमेळा, कोलकात्याची दुर्गापूजा, गुजरातचा गरबा, योग, वैदिक पठणाची परंपरा आणि रामलीला आदींना या यादीत स्थान मिळाले आहे.

दीपावली उत्सव युनेस्कोच्या वारसा यादीत; भारतासाठी अभिमानाची घटना; पंतप्रधान मोदींनी केले निर्णयाचे स्वागत
नवी दिल्ली : भारताचा दीपावली हा प्रकाशाचा सण असून त्याचा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. ही घोषणा दिल्लीतील लाल किल्ल्यात आयोजित युनेस्कोच्या महत्त्वाच्या बैठकीदरम्यान बुधवारी करण्यात आली. त्यानंतर हा परिसर ‘जय हिंद’, ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’ या घोषणांनी दणाणला.
भारतातील १६व्या गोष्टीचा युनेस्कोच्या यादीत समावेश झाला आहे. याआधी कुंभमेळा, कोलकात्याची दुर्गापूजा, गुजरातचा गरबा, योग, वैदिक पठणाची परंपरा आणि रामलीला आदींना या यादीत स्थान मिळाले आहे.
पाकिस्तानच्या बोरिंडो लोकवाद्याचाही सन्मान
पाकिस्तानातील बोरिंडो किंवा भोरिंडो हे लोकवाद्य, पॅराग्वेतील मातीची भांडी बनविण्याची प्राचीन परंपरा, केनियातील डैडा समुदायाचे ‘म्वाझिंडिका’ आध्यात्मिक नृत्य यासह ११ गोष्टींचा त्वरित संरक्षण करण्याच्या हेतूने युनेस्कोच्या यादीत मंगळवारी समावेश करण्यात आला. ८ ते १३ डिसेंबर या कालावधीत लाल किल्ल्यात आयोजिलेल्या युनेस्कोच्या बैठकीत ८० देशांच्या ६७ नामांकनांचा विचार होणार आहे.