दिव्या पार्सेकरला सुवर्णपदक
By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:18+5:302014-12-20T22:27:18+5:30
पेडणे : क्रीडा व युवा व्यवहार खात्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या उंच उडी स्पर्धेत मांद्रे हायस्कूलची विद्यार्थिनी दिव्या पार्सेकर हिने सुवर्णपदक पटकाविले.

दिव्या पार्सेकरला सुवर्णपदक
प डणे : क्रीडा व युवा व्यवहार खात्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील मुलींच्या उंच उडी स्पर्धेत मांद्रे हायस्कूलची विद्यार्थिनी दिव्या पार्सेकर हिने सुवर्णपदक पटकाविले. बरकूर, उडपी (कर्नाटक) येथे ११ जानेवारी २०१५ रोजी होणार्या एका खास समारंभात तिला हे बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. दिव्या मांद्रे हायस्कूलमध्ये १०वीच्या वर्गात शिकत आहे. तिच्या या यशाबद्दल मांद्रे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माधव जोशी, मुख्याध्यापक सुधीर मयेकर, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष किशोर शेटमांद्रेकर व शिक्षक, पालकांतर्फे अभिनंदन केले जात आहे. (प्रतिनिधी)