शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

नागपूरच्या दिव्या देशमुखने बुद्धीबळातलं जागतिक सुवर्णपदक पटकावत रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2017 3:01 PM

मुंबई, दि. 2 - दिव्या देशमुख या नागपूरच्या 11 वर्षांच्या मुलीने ब्राझिलमध्ये झालेल्या 12 वर्षांखालील वर्ल्ड कॅडेट बुद्धीबळ स्पर्धेत ...

ठळक मुद्देमुलींच्या श्रेणीमध्ये झालेल्या 11 च्या 11 फेऱ्यांमध्ये दिव्या अपराजित राहिली आणि 9.5 गुण तिने मिळवलेदिव्या ही स्त्रीरोग तज्ज्ञ असलेल्या जितेंद्र व नम्रता देशमुख या दांपत्याची मुलगी आहेदिव्यामध्ये आत्मविश्वास भरलेला असून ती कुठल्याही दडपणाविना बुद्धीबळ खेळते असे मत तिच्या कोचनी व्यक्त केले

मुंबई, दि. 2 - दिव्या देशमुख या नागपूरच्या 11 वर्षांच्या मुलीने ब्राझिलमध्ये झालेल्या 12 वर्षांखालील वर्ल्ड कॅडेट बुद्धीबळ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये 19 भारतीय खेळाडू सहभागी झाले होते, परंतु केवळ दिव्या पदक मिळवू शकली आणि ते देखील सुवर्णपदक. मुलींच्या श्रेणीमध्ये झालेल्या 11 च्या 11 फेऱ्यांमध्ये दिव्या अपराजित राहिली आणि 9.5 गुण तिने मिळवले.

तिने एकूण 8 सामने जिंकले तर 3 सामने अनिर्णित राहिले. अमेरिकेच्या नतास्जा मेटस या खेळाडूपेक्षा एक गुण जास्त मिळवत दिव्या अव्वल स्थानावर राहिली. दिव्याच्या खालोखाल बारताने केलेल्या सर्वोत्तम कामगिरीमध्ये रक्षिता रावीने आठवे स्थान मिळवले. तर रोहीत कृष्णा एस याला 11 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. भाग्यश्री पाटील 6.5 गुणांसह 15व्या तर ज्ञाना पाटील 6 गुणांसह 18 व्या स्थानावर राहिली.

या स्पर्धेआधी 11 वर्षांच्या दिव्याने चांगली कामगिरी करताना ब्लिट्झ प्रकारामध्ये सुवर्ण, रॅपिडमध्ये रौप्य तर उझबेकिस्तानमधल्या आशियाई युथ चँपियनशिप स्पर्धेत कास्य पदक मिळवले होते. गेल्या वर्षी नवी दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये दिव्याने सुवर्णपदक जिंकले होते. आत्तापर्यंत केलेल्या चमकदार कामगिरीनंतर आता दिव्या देशमुखच्या शिरपेचात 12 वर्षांखालील जागतिक कॅडेट बुद्धीबळ स्पर्धेत सुवर्ण पदकाचा तुरा रोवला गेला आहे. 2014 मध्ये तिने 10 वर्षांखालील वर्ल्ड युथ चेस चँपियनशिप स्पर्धेत डरबानमध्ये सुवर्णपदक मिळवले होते.

दिव्या ही स्त्रीरोग तज्ज्ञ असलेल्या जितेंद्र व नम्रता देशमुख या दांपत्याची मुलगी असून चेन्नईतील आर. बी. रमेश यांच्या चेस गुरूकुल अकादमीची विद्यार्थिनी आहे. दिव्याचं कौतुक करताना, ती अत्यंत मेहनती खेळाडू असल्याचे रमेश म्हणाले. गेली दोन ते तीन वर्षे ती चेस गुरुकूलमध्ये प्रशिक्षण घेत आहे. दिव्यामध्ये आत्मविश्वास भरलेला असून ती कुठल्याही दडपणाविना बुद्धीबळ खेळते असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. या जेतेपदाचा दिव्याला तिच्या करीअरसाठी चांगला उपयोग होईल असेही रमेश यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

तर दिव्याची मेहनत फळाला आल्याची भावना दिव्याची आई नम्रता यांनी व्यक्त केली आहे. रमेश यांच्याकडील प्रशिक्षणाचाही फायदा झाल्याचे त्या म्हणाल्या.