शहरं
Join us  
Trending Stories
1
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
2
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
3
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
4
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
5
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
6
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
7
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू
8
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
9
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
10
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
11
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
12
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
13
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
14
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
15
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
16
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
17
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
18
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
19
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
20
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'

मुलाने जुळवून आणला घटस्फोटित आईचा पुनर्विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 10:35 IST

घटस्फोट घेतलेल्या आईला उर्वरित आयुष्यात आनंद मिळावा, यासाठी तिचा पुनर्विवाह जुळवणाऱ्या केरळच्या कोल्लममधील गोकुळ श्रीधर या २३ वर्षांच्या तरुणाचे कौतुक होत आहे.

तिरुवनंतपूरम : आपल्या वडिलांनी केलेल्या शारीरिक व मानासिक छळाला कंटाळून त्यांच्यापासून घटस्फोट घेतलेल्या आईला उर्वरित आयुष्यात आनंद मिळावा, यासाठी तिचा पुनर्विवाह जुळवणाऱ्या केरळच्या कोल्लममधील गोकुळ श्रीधर या २३ वर्षांच्या तरुणाचे कौतुक होत आहे.गोकूळ इंजिनीअर असून तो इंदिरा गांधी मुक्त विद्यापाठातून बी. ए. करीत आहे. त्याने आई मिनी अयक्कन हिच्या पुनर्विवाहाची माहिती फेसबुक पोस्टवर टाकली. लोकांना हे आवडेल का, याची आपल्याला कदर नाही. तरीही स्त्रीला मन मारून जगावे लागू नये, ही लग्नामागची भूमिकाही श्रीधरने पोस्टमध्ये लिहिली. ती वाचून अनेकांनी त्याचे कौतुक केले. श्रीधरच्या आईचा पी. वेणु या निवृत्त कर्नलशी दुसरा विवाह झाला. वेणु विधूर असून त्यांचा मुलगा व मुलगी नोकरीनिमित्त केरळबाहेर राहतात.मिनी अयक्कन यांचा पहिला विवाह झाला तेव्हा त्या शिक्षिका होत्या. श्रीधरच्या जन्मानंतर घरच्या कटकटींमुळे त्यांनी नोकरी सोडली. पतीच्या छळाला कंटाळून त्या घरातून बाहेर पडल्या तेव्हा श्रीधर शाळेत शिकत होता. नंतर त्यांनी लायब्ररीत नोकरी मिळविली. लायब्ररीतच सहकारी महिलेने अयक्कन यांना पुनर्विवाहासाठी वेणु यांचे स्थळ सुचविले. या उतारवयात पुन्हा लग्न करण्यास अयक्कन सुरुवातीस तयार नव्हत्या. पण श्रीधरने त्यांचे मन वळविले आणि लग्नगाठ जुळवून आणली.श्रीधरने फेसबूकवर लिहिले की, एकदा वडिलांनी मारल्याने आईच्या कपाळातून भळाभळा रक्त वाहत होते. हे सहन करून तू इथे कशाला राहतेस, असे मी भावडेपणाने आईला विचारले होते. तिने माझ्यासाठी छळ सहन करत असल्याचे त्यावेळी सांगितले. ते माझ्या मनावर खोलवर कोरले गेले होते.मोठे झाल्यावर आईला सुखात ठेवायचे, असे त्याने पक्क केले होते. आईने आपल्यासाठी कसा त्याग केला याची शिकून मोठे झाल्यावर कळू लागले. नोकरीनिमित्त कुठे बाहेर गेलो तर आई पुन्हा एकटी होईल, या चिंतेनेही मनात काहूर माजले. आईच्या पुनर्विवाहाचा विषय पुढे आला तेव्हा तिच्या आयुष्यात पुन्हा आनंद फुलविण्याचा आणि तिला तिचे आयुष्य जगू देण्याचा मार्ग म्हणून मलाही तो पटला. >...आणि तो ओक्साबोक्सी रडलाकौतुक करणाऱ्यांपैकी तामिळनाडूतून फोन केलेल्या तरुणाचे कथन श्रीधरच्या मनाला चटका लावून गेले. आपण तुझ्यासारखा आईच्या सुखाचा मार्ग शोधू शकलो नाही, असे सांगत हा अनोळखी इसम फोनवर ओक्साबोक्शी रडू लागला. फोन करणारा तरुण ३० वर्षांचा होता. वडिलांच्या अनिवार छळामुळे त्याच्या आईने आत्महत्या केली होती.

टॅग्स :marriageलग्न